Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संभाजीनगरमध्ये भाजपचा ‘हाऊसफुल्ल’ शो! मुलाखतींना इच्छुकांची तुफान गर्दी; उबाठा गटाला भगदाड पाडत शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपच्या मुलाखतींना मोठा प्रतिसाद. उबाठा गटाचे माजी नगरसेवक विनायक पांडे यांचा भाजपमध्ये प्रवेश. ८ केबिनमध्ये मुलाखतींचे नियोजन.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 19, 2025 | 04:06 PM
संभाजीनगरमध्ये भाजपचा 'हाऊसफुल्ल' शो! (Photo Credit - X)

संभाजीनगरमध्ये भाजपचा 'हाऊसफुल्ल' शो! (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • भाजपमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ!
  • मुलाखतींना विक्रमी प्रतिसाद
  • बंडखोरी रोखण्यासाठी नेत्यांचा ‘प्लॅन रेडी’
Chhatrapati Sambhajinagar Poltical News: महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना पहिल्याच दिवशी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. चिकलठाणा येथील विभागीय कार्यालयात इच्छुकांनी मोठी गर्दी केली असून, भाजपने या प्रक्रियेसाठी चोख नियोजन केले आहे.

८ केबिन, १६ नेते आणि ‘बंडखोरी’ न करण्याचे वचन!

मुलाखतीसाठी येणाऱ्या इच्छुकांची संख्या पाहता भाजपने विशेष व्यवस्था केली आहे. चिकलठाणा कार्यालयात ८ स्वतंत्र केबिनमध्ये १६ ज्येष्ठ नेत्यांमार्फत मुलाखती घेतल्या जात आहेत. उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा वेळ वाचवण्यासाठी महिला व पुरुष उमेदवारांच्या स्वतंत्र याद्या करून एकाच वेळी अनेक मुलाखती घेतल्या जात आहेत. उमेदवारी न मिळाल्यास पक्षाशी प्रतारणा किंवा बंडखोरी करणार नाही, असे लेखी किंवा तोंडी ‘वचन’ही इच्छुकांकडून घेतले जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

हे देखील वाचा: Sambhajinagar MNC Election: छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीची तयारी सुसाट! मतदानासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज

उबाठा गटाला मोठे खिंडार; विनायक पांडे यांचा समर्थकांसह प्रवेश

निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (उबाठा) गटाला शहरात मोठे हादरे बसत आहेत. बेगमपुरा प्रभागातील माजी नगरसेवक विनायक गणू पांडे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. कॅबिनेट मंत्री अतुल सावे आणि शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विनायक पांडे यांच्यासोबत संजय फत्तेलष्कर, नंदकुमार जोशी, विजय सोनटक्के यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी हाती ‘कमळ’ घेतले.

प्रवेशाच्या रांगेमुळे दावेदारांची धाकधूक

शहरात भाजपची वाढती ताकद पाहून इतर पक्षांतील अनेक बडे चेहरे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. मात्र, या ‘इनकमिंग’मुळे वर्षानुवर्षे पक्षात काम करणाऱ्या जुन्या दावेदारांमध्ये उमेदवारी मिळण्याबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज दुसऱ्या टप्प्यातील मुलाखती

शुक्रवारी मुलाखतींचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक १९ ते २९ मधील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जातील. इच्छुकांनी आपल्या प्राथमिक माहितीपत्रासह वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी केले आहे. या प्रक्रियेत मंत्री अतुल सावे, आमदार संजय केणेकर, निवडणूक प्रमुख समीर राजूरकर, अमोल झळके यांसह अनेक पदाधिकारी सक्रिय सहभागी झाले आहेत.

हे देखील वाचा: ‘योग्य सन्मान मिळाला तर ठीक, तुच्छ लेखलेत तर…’ शंभूराज देसाई गरजले, सांगली महापालिका निवडणुकीदरम्यान आव्हान

Web Title: Bjps housefull show in sambhaji nagar a massive crowd of aspirants for the interviews

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 04:06 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar News

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Municipal Election: महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज! २९ प्रभागांतून ११५ नगरसेवक निवडणार
1

Chhatrapati Sambhajinagar Municipal Election: महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज! २९ प्रभागांतून ११५ नगरसेवक निवडणार

मराठवाड्याच्या विकासाला मिळणार चालना; छत्रपती संभाजीनगरमध्ये लवकरच होणार आंतरराष्ट्रीय विमानतळ
2

मराठवाड्याच्या विकासाला मिळणार चालना; छत्रपती संभाजीनगरमध्ये लवकरच होणार आंतरराष्ट्रीय विमानतळ

Chhatrapati Sambhaji Nagar Drainage News: वर्षभरापासून ड्रेनेज लाईनचे काम अर्धवट; कंत्राटदार पसार झाल्याने साईनगरवासीय त्रस्त!
3

Chhatrapati Sambhaji Nagar Drainage News: वर्षभरापासून ड्रेनेज लाईनचे काम अर्धवट; कंत्राटदार पसार झाल्याने साईनगरवासीय त्रस्त!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.