शंभूराज देसाई यांचे खुले आव्हान
योग्य जागा आणि सन्मान हवा
सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीत शिवसेनला योग्य सन्मान आणि योग्य जागा मिळाल्या तर ठीक, जर पण तुच्छ लेखलात तर मग शिवसेना म्हणून लढायची आमची तयार आहे, असा इशारा शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला. सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात मंत्री शंभूराजे देसाई बोलत होते. यावेळी आमदार सुहास बाबर, जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, महापालिका क्षेत्र प्रमुख मोहन वनखंडे, चंद्रहार पाटील, सुनिता मोरे, सचिन कांबळे आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘आम्ही महायुती करूनच निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत आहे. मात्र महायुतीत जागा लढवताना योग सन्मान आणि सन्मानपूर्वक जागा वाटप झाले पाहिजे. सांगली महापालिका मधील जागावाटपाबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी आम्ही चर्चा करू’, असे सांगून मंत्री शंभूराजे देसाई पुढे म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आत्तापर्यंत तीन वर्षात, सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये सव्वाचारशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
Karad: एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेमध्ये आलं – मंत्री शंभूराज देसाई
संजय राऊत बरळत आहेत
आजारपणातून आत्ता बाहेर आलेले खासदार संजय राऊत वाटेल ते बरळत आहेत, त्यांच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष देत नाही असे सांगून मंत्री शंभूराजे देसाई पुढे म्हणाले, वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या सुषमा अंधारे यांना यापूर्वी अब्रू नुकसानीच्या दाव्यासाठी जामीन घ्यावा लागला होता, यापुढे जर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बेछूट आरोप करणार असाल तर पुन्हा एकदा अब्रू नुकसानीच्या दाव्यासाठी तयार राहा, असा इशाराही मंत्री शंभूराजे देसाई यांनी यावेळी दिला.
पृथ्वीराज चव्हाण वेगवेगळी वक्तव्य करीत आहेत कदाचित पूर्वी ते पंतप्रधान कार्यालयामध्ये राज्यमंत्री होते त्यावेळी च्या काही घटना त्यांना आठवत असाव्या त्यामुळेच ते आता वेगवेगळी वक्तव्य करीत आहेत असा तोला यावेळी मंत्री शंभूराजे देसाई यांनी लगावला. यावेळी आमदार सुहास बाबर, चंद्रहार पाटील, मोहन व्हनखंडे,जिल्हाप्रमुख संजय विभूते आदी उपस्थित होते.






