Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर पक्षाची नजर; व्हॉटसअप सर्वेलन्सवर असल्याचे बावनकुळेंनी दिली कबुली

Chandrashekar Bawankule: भंडाऱ्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजप मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 24, 2025 | 12:07 PM
Chandrashekar Bawankule BJP Worker Phone on Surveillance in BJP Bhandara workers meet

Chandrashekar Bawankule BJP Worker Phone on Surveillance in BJP Bhandara workers meet

Follow Us
Close
Follow Us:

BJP Worker Phone on Surveillance: भंडारा : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. यासाठी जोरदार तयारी सुरु झाली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. भंडाऱ्यामध्ये भाजप पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यामध्ये भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी सज्जड दम भरला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना सोशल मीडियाचा वापर जपून करण्याचे सांगितले. मात्र हे सांगताना कार्यकर्त्यांचे मोबाईल आणि व्हॉटसअप सर्वेलन्सवर टाकले असल्याचे धक्कादायक विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

भंडाऱ्यामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “कार्यकर्त्यांनो, सोशल मीडियाचा वापर जपून करा. तुमचं एक चुकीचं बटण पुढच्या पाच वर्षांचा सत्यानाश करेल. तुमच्या एका चुकीमुळे भंडारा शहराचे नुकसान होईल. तुमचे एक चुकीचं पाऊल भंडारा शहर उद्ध्वस्त करेल निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली नाहीं तर रागाच्या भरात काही लोक तमाशा उभा करतात, चुकीचं मत व्यक्त करतात. तुमचं एक चुकीचं मत व तुमच्या बंडखोरीचा पक्षाला मोठा फटका बसेल.” असे स्पष्ट मत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे ते म्हणाले की, तुमच्या चुका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या योजनांचा बट्ट्‌याबोळ केल्‌याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे चुकीचं बटण दाबून भंडाऱ्याचा सत्यानाश करू नका. सर्वांचे मोबाईल फोन सर्वेलन्सवर टाकले आहेत सर्व व्हॉट्सअॅप ग्रुप सर्वलन्सवर टाकले आहेत. कोण काय बोलत्तंय त्यावर लक्ष आहे, असे धक्कादायक विधान भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. भाजप नेत्यांनी केलेल्या एका चुकीच्या सोशल मीडिया पोस्टची किंवा फॉर्वड केलेल्या मेसेजची खूप मोठी शिक्षा भाजप कार्यकर्त्यांना भोगावी लागू शकते.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी इच्छुकांची संख्या मोठी असते. यामध्ये युतीमध्ये लढण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला तर अनेकांचा हिरमोड होऊन बंडखोरीची शक्यता मोठी असते. याचा देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी उल्लेख करत इशारा दिला आहे. ते म्हणाले की, तुमचं एक चुकीचं बटन पाच वर्षांचं नुकसान करेल. निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याच्या रागात एखादा कार्यकर्ता, पदाधिकारी तमाशा करतो, मात्र, आता कार्यकर्त्याने बंडखोरी केली तर त्या कार्यकर्त्यांसाठी नेत्यांची दारं बंद होतील”,असा इशारा देखील भाजप नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

Web Title: Chandrashekar bawankule bjp worker phone on surveillance in bjp bhandara workers meet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2025 | 12:05 PM

Topics:  

  • bhandara news
  • BJP Politics
  • chandrashekar bawankule

संबंधित बातम्या

भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल होणार; नितीन नबीन संपूर्ण ‘टीम’च बदलणार?
1

भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल होणार; नितीन नबीन संपूर्ण ‘टीम’च बदलणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.