राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव रातोरात कुणी बदलले? सांगतील राजकारण पेटणार
Sangali News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या राजारामबापू पाटील सहकारी साखर कारख्यान्याचे नाव रातोरात बदलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जयंत पाटील यांच्या कारखान्याचे नाव राजारामबापू सहकारी साखर कारखाना असे होते. पण काल रात्री कारखान्याच्या प्रवेशद्वारावरील कमानीवर ‘राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना’ असा नवीन फलक लावण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
महापुरुषांचे चित्र आणि विजयसिंह राजे डफळे असा मजकूर असलेला डिजिटल फलक कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरील कमानीवर लावण्यात आला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना उद्देशून, “राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा यंदा धुराडा पेटू देणार नाही” असा इशारा दिला होता. त्यामुळे या घटनेमागे राजकीय हेतू असल्याची चर्चा सध्या जत तालुक्यात रंगली आहे. पण काल रात्रीच्या या प्रकारानंतर पाटील आणि पडळकर यांच्यातील संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याशिवाय जयंत पाटील यांची कोंडी करण्याची प्रयत्न सुरू असल्याची चर्चाही जिल्ह्यात सुरू झाली आहे. या प्रकारामुळे सांगली जिल्ह्यातील राजकारण आता अधिकच तापणार आहे. तसेच, सांगलीत जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचे हे कृत्य असल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरू झाली आहे.
राजे विजयसिंह डफळे हे जत संस्थानाचे शेवटचे राजे होते. १९२८-१९४८ या कालावधीत त्यांच्या नावाने अनेक सामाजिक, औद्योगिक आणि शैक्षणिक संस्थांची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना विशेष महत्त्वाचा मानला जातो. हा कारखाना जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मेहनतीने आणि सहभागाने उभा करण्यात आला होता. या कारखान्यांमुळे स्थानिक शेतकऱ्यांना रोजगार आणि आर्थिक स्थैर्यही मिळाले.
तुम्हाला जतची इतकी काळजी असेल तर जतचा साखर कारखाना सभासदांना देऊन टाका. नाहीतर मी राजारामापू पाटील सहकारी साखर कारखानान युनीट चारचे धुराडे पेटू देणार नाही. त्यासाठी मोठा संघर्ष करण्याची माझी तयारी आहे. वेळ पडली तर कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई करण्याची तयारी आहे, हा कारखाना सभासदांना परत केल्याशिवाय तो सुरू होऊ देणार नाही, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला होता.






