
Chhatrapati Sambhajinagar, Devendra Fadnavis, Marathwada News, Maharashtra Politics
मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन करून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर ध्वजारोहण झाले. यावेळी त्यांनी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान आणि दुष्काळी परिस्थितीवरील उपाययोजनांची माहिती दिली.
Gondhal Movie: Oscarसाठी मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची निवड; विविध भाषांमधील 33 चित्रपटांना टाकले
मराठवाड्यात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने खरिपाची पेरणी झाली; मात्र, त्यानंतर पावसाने मोठी दडी मारल्याने पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. एनडीआरएफच्या निकषानुसार ५ ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार असले तरी त्यापूर्वीच मदत पोहोचविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
उबाठाचे आंदोलन नाकर्तेपणाचे
उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारविरोधात केलेले आंदोलन हे नाकत्यांचे आंदोलन असल्याची टीका फडणवीस यांनी केली. संधी मिळूनही ज्यांना काही करता आले नाही, त्यांचे हे आंदोलन आहे. ‘तुम्ही फक्त विरोध करीत राहा, आम्ही करून दाखवू, असे ते म्हणाले.
शहराची नवीन पाणीपुरवठा योजना अंतिम टण्यात असून, लवकरच प्रत्येक घरात दररोज पाणी पोहोचेल. समृद्धी महामार्ग-डीएमआयसी परिसरात्त टोयोटा, अथर आणि जेएसडब्ल्यूकडून ई-कोईकल उत्पादन होणार असून, उद्योगांसाठी सुमारे आठ हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. यातून रोजगारनिर्मिती होईल, असेही त्यांनी सांगितले.
यूपीआयमुळे अनुदान थेट बैंक खात्यात जमा होत असल्याने भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर यावरून आरोप करतात; मात्र ते लिहून दिलेले वाचतात आणि सकाळी, संध्याकाळी व रात्री वेगवेगळे बोलतात, अशी टीका फडणवीस यांनी केली.