
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का
निकाल काहीर होताच नेत्यांनी ठोकला रामराम
छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकारण तापले
छत्रपती संभाजीनगर: काल राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये राज्यात महायुतीने घवघवीत यश प्राप्त केले आहे. महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. दरम्यान भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला चिंतन करण्याची आवश्यकता असल्याचे समोर आले आहे. त्यातच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पक्षातील एक महत्वाचा नेता त्यांची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे निवडणुकीचा निकाल जाहीर होताच ठाकरेंच्या पक्षाला धक्का बसण्याचा अंदाज आहे. उद्धव ठाकरे गटाचे महानगर प्रमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे समोर येत आहे.
महाविकास आघाडीचा सुपडा साफ
लाडकी बहीण नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीतही भावाच्या मदतीला धावली अशी चर्चा रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. जिल्ह्यातील चार नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायत यांच्या निवडणुकीची मतमोजणी रविवारी झाली आणि त्यानंतर जे निकाल बाहे आले त्यावरून रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीची राजकीय पकड मजबूत असल्याचे स्पष् झाले आहे. या निवडणुकीत रत्नागिरी, चिपळूण, खेड नगरपरिषदा तसेच लांजा नगरपंचायतीवर शिंदे शिवसेनेचा भगवा फडकला आहे. या ठिकाणी शिंदे शिवसेनेचे नगराध्यक्ष विजयी आहेत त देवरुख आणि गुहागर नगरपंचायतीव भाजपने विजयाच्या रूपाने झेड फडकवला आहे.
या ठिकाणी भाजपाचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. राजापुर नगर परिषदेचा अपवाद वगळता रत्नागिरी जिल्ह्यातील सहा नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये महायुतीने विरोधी महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला आहे. राजापूर नगर परिषदेत महाविकास आघाडीतील घटक काँग्रेसने आपला गड राखला आहे.
“काँग्रेसमुक्त नगरपालिका तयार…”; भाजपच्या अभूतपूर्व यशावर Devendra Fadnavis यांनी विरोधकांना डिवचलं
या ठिकाणी काँग्रेसच्या माजी आमदार आणि काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार हुस्नबानू खलिफे या विजयी झाल्या आहेत. दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीवर सर्वांचेच लक्ष होते या कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप आणि शहर विकास आघाडी यांच्या जबरदस्त राजकीय ज होती आणि यामध्ये या शहर विकासम आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या निलेश राणे यांना यश मिळाले आहे.