Chitra Wagh alleges that Manoj Jarange Patil insulted cm Devendra Fadnavis mother
Manoj Jarange Patil : मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यात यावे अशी महत्त्वाची मागणी जरांगे पाटलांनी केली आहे. यासाठी येत्या 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे आंदोलन करण्यासाठी रवाना होणार आहे. यापूर्वी त्यांनी बीडमध्ये सभा घेत महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मात्र यामध्ये अनेकदा जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक टीका केली आहे. यावरुन आता भाजप नेते देखील आक्रमक भूमिका घेतली आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी बीडमध्ये सभा घेतली. यामध्ये त्यांनी महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा आपल्या भाषणांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख केला आहे. यानंतर जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या आईचा देखील उल्लेख केला. यावरुन भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भाजप नेत्या व विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या व्हिडिओ देखील शेअर केल्या आहेत. या व्हिडिओमध्ये जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्या आईच्या नावाचा उल्लेख करत त्यांचा अपमान करत आहेत. यावरुन चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. चित्रा वाघ यांनी लिहिले आहे की, सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेंना माफ करणार नाही… ‘डीजे’वर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयाने. कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलिसांवर….आणि जरांगे घसरतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईवर व्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरांगेनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केला…! असे करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असूच शकत नाही..!, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.
सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेंना माफ करणार नाही…
‘डीजे’वर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयाने.
कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलिसांवर.
…आणि जरांगे घसरतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईवरव्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरांगेनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा… pic.twitter.com/gu7FRkobND
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 24, 2025
तर शब्द मागे घेतो… – जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील यांच्यावर भाजप नेत्यांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. यानंतर जरांगे पाटील यांनी आपल्या बोलण्याचे स्पष्टीकरण दिले आहे. जरांगे पाटील म्हणाले की, “मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईविषयी काही बोललोच नाही. मी त्यांच्या आईवर कुठे आणि केव्हा बोललो. परंतु बोलण्याच्या ओघातून माझ्या तोंडातून तसा काही शब्द गेला असेल तर तो मी माघारी घेईन, ज्या पोलिसांना सस्पेंड करायला पाहिजे होते, त्यांना तू मोठी पदं दिली. पोलिसांनी आमच्या आई-बहिणींना मारले तेव्हा त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. तुझी आई तुला प्रिय आहे तशी आम्हाला आमची आई प्रिय आहे. तू मराठ्यांना आरक्षण दे तुझ्या आईची पूजा करतो,” असे म्हणत जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांचा एकेरी उल्लेख केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तू माझ्या नादी लागू नकोस…
जरांगे पाटील यांनी टीका करणाऱ्या चित्रा वाघ यांच्यावर देखील प्रत्युत्तर दिले आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “तू माझ्या नादी लागू नकोस…माझ्या नादी लागलीस तर तुझं सगळं गबाळ उचकीन. संध्याकाळपर्यंत तुझी सगळी माहिती माझ्यापर्यंत येईल,” अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी चित्रा वाघ यांच्यावर केली आहे.