
CJP, Abhijeet Dipke, Sourav Das, Ashutosh Ranka, Cockroach Janata Party
अभिजीत दिपके, सौरव दास आणि मला कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते, त्यासाठी प्लॅनिंगदेखील सुरु आहे. असा दावा आशुतोष यांनी केला आहे. आशुतोष रांका यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर एक्स अकाऊंटवरुन ट्विट करत एक धक्कादायक दावा केला आहे. “अनेक लोकांनी कळवले आहे की, अभिजीत दिपके, सौरव दास आणि मला १० तारखेपूर्वी कधीही NSA किंवा तत्सम कायद्यांखाली अटक होऊ शकते. आम्ही तिघेही ६ जूनपासून तुरुंगात जायला तयार आहोत. आम्हाला त्याची अजिबात भीती नाही.
Multiple sources have reached out informing that @abhijeet_dipke @SauravDassss and I will be arrested anytime before 10th under NSA/other equivalent provisions. All three of us have been ready to go to Jail since June 6. There is no fear about it. But the ones hell bent on destroying this country should be the ones frightened. And they are. As Gandhi said, “violence and hatred stem from fear”. The govt is frightened, and that’s why it is resorting to violence. We are 30 year olds fighting for a better, more accountable India. We have nothing to lose. You can arrest us, beat us, even kill us. But you cannot stop us. “अगर मार भी दिया तो हमारी चिता से निकलने वाली आग तुम्हारे महलों को पिघला देगी।” — Ashutosh Ranka (@AshutoshRanka) October 5, 2026
पण जे या देशाला उद्ध्वस्त करण्यासाठी टपले आहेत, भीती तर त्यांना वाटली पाहिजे. आणि ते घाबरत आहेत. गांधीजी म्हणाले होते, “हिंसा आणि द्वेष हे भीतीतूनच जन्माला येतात.” सरकार घाबरले आहे, आणि म्हणूनच ते आता हिंसेचा मार्ग अवलंबत आहे.
आम्ही ३० वर्षांचे तरुण आहोत, जे एका चांगल्या आणि अधिक जबाबदार भारतासाठी लढत आहोत. आमच्याकडे गमावण्यासारखे काहीही नाही. तुम्ही आम्हाला अटक करू शकता, मारहाण करू शकता, अगदी ठारही मारू शकता. पण तुम्ही आम्हाला थांबवू शकत नाही. “जरी तुम्ही आम्हाला ठार मारले, तरी आमच्या चितेच्या आगीने तुमचे महाल वितळतील.” असा इशाराही आशुतोष रांका यांनी केला आहे. आशुतोष रांका यांनी त्या तिघांसह सीजेपीच्या रत्ना सिंग आणि इतर नेत्यांनाही अटक करण्यासाठी प्लॅनिंग सुरू असल्याचे आम्हाला अनेकांकडून कळवले जात आहे. असा दावा केला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनीही असाच दावा केला होता. केंद्र सरकाकडून मी ( सौरव दास), अभिजीत दीपके, आशुतोष रांका, रत्ना सिंग आणि कॉकरोच जनता पक्षाच्या इतर नेत्यांना अटक करण्याची योजना आखली जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. सौरव दास यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले, “जर सरकारला वाटत असेल की अशा हुकूमशाही उपायांमुळे फायदा होईल, तर त्यांचा गैरसमज आहे. देशाची तरुण पिढी आता जागी झाली आहे. आम्ही सर्वांना आवाहन करतो की, आपण जगू वा मरू, आपल्या हक्कांसाठी आणि चांगल्या भविष्यासाठीचा लढा सुरू ठेवा.” आम्ही तुरुंगात जाण्यास किंवा त्याहूनही वाईट परिणामांना सामोरे जाण्यास नेहमीच तयार आहोत, परंतु ही सरकारची मोठी चूक ठरेल, कारण देशातील तरुण हे सहन करणार नाहीत.” अशी प्रतिक्रीया सौरव दास यांनी दिली होती.
आशुतोष यांच्या यादाव्यानंतर अभिजीत दिपके यांनी यावर प्रतिक्रीया दिली आहे. “जर सरकारला वाटत असेल की यूएपीए (UAPA), एनएसए (NSA) किंवा तुरुंगवासाच्या धमकीने आम्ही गप्प बसू तर तसे होणार नाही.आम्ही कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास आणि गरज पडल्यास महिने किंवा वर्षे तुरुंगात घालवण्यासही तयार आहोत, पण लोकशाही वाचवण्याच्या आमच्या लढ्यातून आम्ही मागे हटणार नाही. आम्ही महात्मा गांधींनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करतो आणि सरकार आम्हाला कितीही घाबरवण्याचा प्रयत्न करो, आम्ही शांततापूर्ण आणि अहिंसक मार्गाने आंदोलन करत राहू.” असं अभिजीत दिपकेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, येत्या १० ऑक्टोबर रोजी दिल्लीत नियोजित असलेले सीजेपीचे आंदोलन शांततापूर्ण असेल. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांचे समर्थन करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन सीजेपीने केले आहे. तसेच, १० ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणारे त्यांचे प्रस्तावित आंदोलन शांततापूर्ण असेल. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांचे समर्थन करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आंदोलनात सहभागी व्हावे, जर ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला नाही, तर देशभरातील नागरिक आणि संघटनेचे सदस्य नवी दिल्लीत एकत्र जमतील आणि जंतर मंतरवर भव्य आंदोलन करतील, असंही अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे.