Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Warning Dnyanesh Kumar: “सरफ़रोशी की तमन्ना…” CJP आक्रमक; SIR आणि मतदार यादी गैरप्रकारावरून थेट संघर्षाची तयारी

विशेष सखल पुनरिक्षण (SIR) आणि निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकाराच्या मुद्द्यावरून 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) आणि केंद्रीय निवडणूक आयोग (ECI) यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 26, 2026 | 11:48 AM
CJP Warning Dnyanesh Kumar: “सरफ़रोशी की तमन्ना…” CJP आक्रमक; SIR आणि मतदार यादी गैरप्रकारावरून थेट संघर्षाची तयारी
Follow Us
Follow Us:
  • सीजेपीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना दिलेला ४८ तासांचा राजीनाम्याचा अल्टिमेटम पूर्ण
    मागणी पूर्ण न झाल्याने पक्षाने कार्यकर्त्यांना तयार राहण्याचे आवाहन करत २ ऑक्टोबरपासून थेट संघर्षाचा इशारा
    अल्टिमेटम संपल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त किंवा आयोग यावर काय स्पष्टीकरण देणार, याकडे सर्वांचे लक्ष
Dyanesh Kumar Resignation Demand: विशेष सखल पुनरिक्षण (SIR) आणि निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकाराच्या मुद्द्यावरून ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) आणि केंद्रीय निवडणूक आयोग (ECI) यांच्यातील संघर्ष आता विकोपाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक प्रक्रियेत गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर सीजेपीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना ४८ तासांत राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. राजीनामा न दिल्यास २ ऑक्टोबरपासून आंदोलनाचाही इशारा दिला आहे

सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सीजेपीने पुन्हा एकदा इशारा दिला आहे. ४८ तासांचा अल्टिमेटम संपल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने आपल्या पुढील रणनीतीची घोषणा करताना अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना तयार राहण्याचे आवाहन करत म्हटले आहे की, “सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है ज़ोर कितना बाज़ुए-क़ातिल में है… तुम्ही सर्वजण तयारीला लागा, आता थेट २ ऑक्टोबर रोजी भेटू.” अल्टिमेटम संपल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यावर काय भूमिका घेतात किंवा निवडणूक आयोग यावर काही स्पष्टीकरण जारी करतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

आगामी विधानसभा निवडणुका स्थगित करण्याचीही मागणी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत सीजेपीने गुरुवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी जर ज्ञानेश कुमार यांनी ४८ तासांच्या आत राजीनामा दिला नाही, तर देशव्यापी आंदोलने सुरू केली जातील, असा इशारा दिला आहे. इतकेच नव्हे तर, सीजेपीने आगामी विधानसभा निवडणुका स्थगित करण्याचीही मागणी केली आहे.

सीजेपीचे संस्थापक आणि संयोजक अभिजित दीपके म्हणाले की, त् संघटना नवी दिल्ली तसेच देशभरात आंदोलने करेल. सीजेपीचे सह-संयोजक सौरभ दास यांनी तीन मागण्या मांडल्या: मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा, ज्ञानेश कुमार आणि त्यांना कथितपणे सूचना देणाऱ्यांवर फौजदारी कारवाई, आणि सर्व आगामी निवडणुकांवर बंदी घालण्यात यावी,अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Military Hospital Khadki Recruitment : १० वी पास महिलांसाठी सुवर्णसंधी; खडकी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये

तसेच, एसआयआरला २०२५ च्या मतदार यादीत पुन्हा समाविष्ट करावे, एसआयआरशी संबंधित फायली सर्वोच्च न्यायालयाच्या नेतृत्वाखालील समितीच्या देखरेखेखाली ठेवाव्यात आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसंबंधीचा कायदा रद्द करावा,असही त्यांनी म्हटलं आहे.

‘द इंडियन एक्सप्रेस’च्या एका वृत्तामुळे हा संपूर्ण वाद सुरू झाला, ज्यात असा दावा करण्यात आला होता की, निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि दोन निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू व विवेक जोशी यांच्यात एसआयआर (SIR) तसेच इतर निर्णयांसंदर्भात मतभेद होते. या वृत्तानुसार, सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या १० महिन्यांत निवडणूक आयोगाच्या विविध निर्णयांवर आणि कामकाजावर १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवले होते.

 

Web Title: Cjp vs election commission 48 hour ultimatum expires cec gyanesh kumar resignation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • Cockroach Janata Party
  • election commission of india
  • SIR

संबंधित बातम्या

CJP Demands Gyanesh Kumar Resignation: ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास…; अभिजीत दिपकेंकडून आंदोलनाची घोषणा
1

CJP Demands Gyanesh Kumar Resignation: ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास…; अभिजीत दिपकेंकडून आंदोलनाची घोषणा

Election Commission Controversy : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात थेट हायकोर्टात याचिका; SIR थांबवण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?
2

Election Commission Controversy : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात थेट हायकोर्टात याचिका; SIR थांबवण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार

Jitendra Awhad on Dnyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमार यांना हाकलून द्या’; जितेंद्र आव्हाड आक्रमक, फॉर्म-6 फाडून केला निषेध
4

Jitendra Awhad on Dnyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमार यांना हाकलून द्या’; जितेंद्र आव्हाड आक्रमक, फॉर्म-6 फाडून केला निषेध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.