राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका
फडणवीसांनी दिले राहुल गांधी यांना प्रत्युत्तर
भारतातील लोकशाही व्यवस्था मोठ्या हल्ल्याखाली आहे- राहुल गांधी
कोलंबिया विद्यापीठात झालेल्या एका कार्यक्रमात राहुल गांधी म्हणाले, “भारतात अनेक धर्म, परंपरा आणि भाषा आहेत. लोकशाही व्यवस्था सर्वांना जागा देते. परंतु सध्या, लोकशाही व्यवस्था सर्व बाजूंनी आक्रमण करत आहे. विविध परंपरा, धर्म आणि विचारांना एकत्र येण्यासाठी एक जागा आवश्यक आहे आणि ती जागा निर्माण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लोकशाही व्यवस्था. सध्या भारतातील लोकशाही व्यवस्था मोठ्या हल्ल्याखाली आहे.” राहुल गांधी यांच्या विधानाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
राहुल गांधी यांना भारताच्या संविधानवर अजिबात विश्वास नाहीये. याचे कारण त्यांना भारताचा इतिहास माहिती नाही. त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावून संविधान बदलण्याचा आणि एकाधिकारशाही लादण्याचा प्रयत्न केला. हे भारताचे लोकतंत्र आहे जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले आहे.
साइबर जनजागृति माह की शुरुआत, राहुल गांधी की झूठ की राजनीति, घुसपैठियों पर कार्रवाई समेत विभिन्न मुद्दों पर मीडिया से संवाद… (मुंबई | 3-10-2025)#Maharashtra #Mumbai #CyberAwarenessMonth pic.twitter.com/c80VnS5lwH — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 3, 2025
राहुल गांधींचे डोके कमकुवत आहे. म्हणूनच ते सिरियल लायर आहेत, हे वारंवार सांगतो आहे. कॉँग्रेसच्या नेतृत्वाला भारतीय लोकशाही कळत नाही हे यावरून स्पष्ट होते. तसेच त्यांच्या जनतेच्या ताकदीवर विश्वास नाही. लोकशाही मूल्यांशी तडजोड केली जाणार नाही हे या देशातील जनतेने वारंवार दाखवून दिले आहे.
राहुल गांधी यांचे विधान काय? कोलंबिया विद्यापीठात झालेल्या एका कार्यक्रमात राहुल गांधी म्हणाले, “भारतात अनेक धर्म, परंपरा आणि भाषा आहेत. लोकशाही व्यवस्था सर्वांना जागा देते. परंतु सध्या, लोकशाही व्यवस्था सर्व बाजूंनी आक्रमण करत आहे.” राहुल गांधी पुढे म्हणाले, “भारताकडे जगाला देण्यासाठी खूप काही आहे आणि ते खूप आशावादी आहेत. परंतु त्याच वेळी, काही कमतरता आणि धोके आहेत ज्या भारताने दूर केल्या पाहिजेत. सर्वात मोठा धोका म्हणजे लोकशाहीवरील हल्ला.”
राहुल गांधींच्या या वक्तव्यावर भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, राहुल गांधी पुन्हा एकदा प्रचार नेत्यासारखे वागत आहेत. “राहुल गांधी पुन्हा एकदा विरोधक – प्रचाराचे नेते असे वागत आहेत. ते परदेशात जातात आणि भारतीय लोकशाहीवर हल्ला करतात! शेवटी, ते भारताशी लढू इच्छितात! कधीकधी ते अमेरिका आणि ब्रिटनला आमच्या कारभारात हस्तक्षेप करण्यास सांगतात आणि आता हे.”, असं प्रत्युत्तर भाजपाकडून देण्यात आले.