cm devendra fadnavis on sanjay gaikwad beaten canteen employee
CM Fadnavis on Sanjay Gaikwad : मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे चर्चेत आले आहेत. संजय गायकवाड हे यांनी त्यांना मिळालेल्या निकृष्ट दर्जाच्या जेवणावरुन आकाशवाणी आमदार निवासामध्ये जोरदार धुमाकूळ घातला. काल (दि.08) रात्री झालेल्या या प्रकारानंतर त्यांचा कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणावरुन त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीकास्त्र डागले आहे. मात्र आमदार गायकवाड यांना त्यांच्या मारहाणीचा कोणताही पश्चत्ताप नसल्याचे दिसून आले आहे. मात्र या घटनेवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय गायकवाड यांचे कान टोचले आहेत.
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे आकाशवाणी आमदार निवास येथे मुक्कामास होते. कॅन्टीनमध्ये बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जेवणाची ऑर्डर दिली. त्यांना ते असलेल्या रुममध्ये जेवणही पुरवण्यात आलं. मात्र जेवणात देण्यात आलेलं वरण आणि भात हे शिळ होतं व त्याचा वास येत होता असा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी केला कृष्ट दर्जाच जेवण दिलं म्हणून त्यांनी थेट कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. कॅन्टीन चालकाला त्यांनी बोलावून घेत दिलेल्या अन्नाचा वास घेण्यास सांगितले. अन्न खराब झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कॅन्टीन चालकाला जाब विचारला. मात्र त्यानंतर त्यांनी कॅन्टीन चालकाच्या थेट कानशिलात लगावली. सलग एका मागून एक बुक्क्या देखील मारल्या. या प्रकरणावरुन विधीमंडळामध्ये देखील आवाज उठवण्यात आला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या प्रकरणावरुन विधीमंडळामध्ये देखील ऊहापोह झाला. आमदार संजय गायकवाड यांची वर्तवणूक बरोबर नसल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आमदार संजय गायकवाड यांचा व्हिडीओ पाहिला अशाप्रकारचे वर्तन विधीमंडळ सदस्यास भूषणावह असे नाही. यामुळे विधीमंडळाची प्रतिष्ठा, प्रतिमा कमी होत आहे. आमदार निवासात सोयी-सुविधा नाहीत, अशी नाराजी व्यक्त केली जात आहे. अशावेळी तक्रार करावी पण लोकप्रतिनिधींनी मारहाण करणे चुकीचे आहे. तसेच विधीमंडळ अध्यक्ष आणि विधानपरिषदेच्या सभापतींनी याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी,” असे देखील मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.
जर कुणी मला विष चारत असेल तर…
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संजय गायकवाड यांनी विधीमंडळाच्या आवारामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या प्रतिक्रियेवरुन संजय गायकवाड यांना त्यांच्या कृतीचा कोणताही पश्चत्ताप नसल्याचे दिसून आले. आमदार गायकवाड म्हणाले की, “जर कुणी मला विष चारत असेल तर मी त्याची पूजा करायची का? बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला हे शिकवले नाही. आमच्यावर अन्याय झाल्यास त्याविरोधात पेटून उठण्याची शिकवण त्यांनी दिली होती,” अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “मी आकाशवाणी आमदार निवासातील कॅटिन चालकांना वारंवार विनंती केली होती की, त्यांनी जेवणाचा दर्जा सुधारावा. मात्र तरीही काहीच सुधारणा झाली नाही मी ३० वर्षांपासून आकाशवाणी कैटिनमध्ये येत आहे. ५५ वर्षांपासून इथे राहत आहे, जेवणाचा दर्जा सुधारा, असे मी अनेकदा सांगितले होते. येथील अडी १५ दिवसांपूर्वीची आहेत, मांस १५ ते २० दिवसांपासून शिळे आहे, भाज्याही जुन्या असतात इथे रोज पाच ते दहा हजार लोक जेवतात. सर्वांच्या अशाच प्रकारच्या तक्रारी आहेत,” असे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले आहेत.