Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP प्रमुख अभिजीत दीपकेंचा नवा व्हिडिओ; ‘विमानतळाऐवजी थेट पोलीस ठाण्यात’ येण्याचे आवाहन

माझ्या मित्रांना आणि कुटुंबीयांना वाटते की मला विमानतळावर अटक करून तुरुंगात पाठवले जाईल, पण मला आशा आहे की आपला देश अजूनही लोकशाहीवादी आहे आणि आपल्याला शांततापूर्ण आंदोलन करण्याची परवानगी मिळेल."

  • By अनुराधा धावडे
Updated On: Jun 05, 2026 | 04:08 PM
Abhijit Dipke CJP Delhi airport video 2026, Cockroach Janta Party

Abhijit Dipke CJP Delhi airport video 2026, Cockroach Janta Party

Follow Us
Follow Us:

 

Abhijit Dipke  Viral video: कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांनी ६ जून रोजी भारतात परतण्यापूर्वी केलेल्या आपल्या पूर्वीच्या आवाहनावरून यू-टर्न घेतला आहे. त्यांनी ४ जून रोजी रात्री १० वाजता सोशल मीडियावर एक व्हिडिओ संदेश जारी करून समर्थकांना दिल्ली विमानतळावर न येण्याचे आवाहन केले आहे.

काही दिवसांपूर्वी, त्यांनी स्वतःच समर्थकांना विमानतळावर पोहोचण्याचे आवाहन केले होते. पण सुरक्षेच्या कारणास्तव आणि इतर प्रवाशांना त्रास होऊ नये, यामुळे अभिजीत दिपके यांनी त्यांच्या समर्थकांना विमानतळावर न येण्याचे आवाहन केलं आहे. गुरूवारी सायंकाळी एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी विमानतळावर येऊ नका असं म्हटलं आहे.

El Nino मुळे पुन्हा चिंता वाढली! पॅसिफिक महासागरातील तापमानात वाढ; भारतीय मान्सूनवर परिणाम होणार?

अभिजीत दिपके म्हणाले की, ” ६ जूनला मी दिल्ली विमानतळावर येण्याचे आवाहन केलं होतं. त्यानंतर खूप सारे लोक थेट विमानतळावर यायला तयारही झाले. पण मला वाटलं नव्हतं की मला इतका पाठिंबा मिळेल, पण आता माझी विनंती आहे की, विमानतळावर खूप सारे लोक जमले तर तेथील लोकांना अडचण निर्माण होऊ शकते. आपल्या कोणत्याही प्रकारे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ द्यायचा नाही. त्यामुळे मी विमानतळाहून थेट पार्लमेंट रस्ता पोलीस ठाण्यात जाणार आहे. तुम्ही देखील पार्लमेंट रस्ता पोलीस ठाण्याच्या परिसरात या, आपल्यामुळे लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास व्हावा, अशी माझी इच्छा नाही. आपल्यामुळे विमानतळाच्या परिसरात कोणलाही त्रास होऊ नये. मी स्वत: पार्लमेंट रस्त्यावरील पोलीस ठाण्यात जाणार आहे. तुम्हीही तिथेच या. पोलिसांची परवानगी घेऊन आपण जंतर मंतरवर एकदम शांततेत आपले आंदोलन करूयात.

लक्षात ठेवा आपल्याला खूप खबरदारीने आणि जबाबदारीने हे सर्व करायचे आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेच्या नियमांचे उल्लंघन करायचे नाही. यांना आपले आंदोलन रोखण्यासाठी एकच संधी हवी आहे, ती आपल्याला त्यांना द्यायची नाही. त्यामुळे सर्वांनी एअरपोर्टवर न येता पार्लमेंट रोड पोलीस ठाण्यात यायचे आहे.

दरम्यान, अभिजीत दिपके यांनी यापूर्वीही एक व्हिडिओ संदेश शेअर केला होता. त्यात त्यांनी, भारतात आल्यावर आपल्याला विमानतळावरच अटक होऊ शकते, अशी शंका व्यक्त केली होती. पण आता त्यांनी थेट पोलिस ठाण्यात येण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, सीजेपीच्या तीन प्रवक्त्यांनी ४ जून रोजी दिल्लीत आपली पहिली पत्रकार परिषद घेतली. पहिल्यांदाच पक्षाच्या तीन प्रवक्त्यांनी जनतेसमोर आपल्या मागण्या मांडल्या. त्यांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आणि सरकार व विरोधी पक्ष या दोघांशीही संवाद साधण्याची तयारी दर्शवली होती.

अखेर छत्रपती संभाजीनगरकरांची तहान भागणार! ‘अमृत-२’ योजनेतून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू; शहराला मिळणार

आपण अजून किती काळ भीतीत जगणार? – अभिजीत दीपक

यापूर्वी, अभिजीत दीपकने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. ‘कॉकरोच इज बॅक’ नावाच्या अकाऊंटवर अभिजीतचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये अभिजीत म्हणाले की, “मी भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मी माझ्या देशात, माझ्या घरी परत येत आहे. पेपरफुटीमुळे आम्ही खूप दिवसांपासून सोशल मीडियावर आवाज उठवत आहोत. नीट (NEET) परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि लाखो विद्यार्थ्यांच्या वाया गेलेल्या मेहनतीसाठी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे.” अशी मागणी त्यांनी केली होती.

शेवटी ते म्हणाले, “माझ्या मित्रांना आणि कुटुंबीयांना वाटते की मला विमानतळावर अटक करून तुरुंगात पाठवले जाईल, पण मला आशा आहे की आपला देश अजूनही लोकशाहीवादी आहे आणि आपल्याला शांततापूर्ण आंदोलन करण्याची परवानगी मिळेल.” मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे: मी गांधी, आंबेडकर, भगतसिंग आणि नेहरू यांचा आदर करतो आणि माझा भारताच्या संविधानावर इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त विश्वास आहे. तुरुंगाच्या भीतीबद्दल बोलायचे झाल्यास, आपण आणखी किती काळ भीतीत जगणार? हा देश कोणत्याही पक्षाचा नाही. हा देश आपल्या सर्वांचा आहे. आपले भविष्य उद्ध्वस्त होत आहे.” अशी भितीही त्यांनी व्यक्त केली होती.

 

 

 

Web Title: Cockroach janta party abhijit dipke parliament road police station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • Delhi Police

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.