Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Crime: दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार अन् नंतर…

मित्राला भेटण्यासाठी घराबाहेर पडलेल्या १६ वर्षीय मुलीचा मृतदेह दोन दिवसांनी दिल्लीतील एका शेतात आढळला आणि तपासाला सुरुवात झाली. प्रत्यक्षदर्शी नसतानाही पोलिसांनी ५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजचा माग काढत अवघ्या ७२ तासांत चार संशयितांना ताब्यात घेतले.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 18, 2026 | 01:56 PM
Delhi Crime: दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचारानंतर...

Delhi Crime: दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचारानंतर...

Follow Us
Follow Us:
  • मित्राला भेटायला गेली अन् जीव गमावला
  • ५० सीसीटीव्हीतून आरोपींचा माग काढला
  • तीन अल्पवयीनांसह चौघे ताब्यात
नवी दिल्ली: मित्राला भेटण्यासाठी घराबाहेर पडलेल्या १६ वर्षीय मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीतील स्वरूप नगर परिसरात समोर आला आहे. मुलीचा मृतदेह १३ सप्टेंबरला कुशक रोडजवळील एका मोकळ्या शेतात आढळून आला. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आणि अवघ्या ७२ तासांत चार जणांना ताब्यात घेतले. यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

हेही वाचा: Pune Crime: अवघ्या थुंकण्यावरून वाद टोकाला; मुंढव्यात लोखंडी हत्याराने दोघांवर हल्ला

मित्राला भेटण्यासाठी गेली होती

पोलिसांच्या तपासानुसार, पीडित मुलगी शाळा सोडलेली होती आणि कुटुंबाला हातभार लावण्यासाठी नोकरीच्या शोधात होती. ती १७ वर्षीय एका मुलाला ओळखत होती. त्याला भेटण्यासाठी ती घटनेच्या दिवशी बाहेर पडली होती. या मुलाने आपल्या अन्य मित्रांना बोलावल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या माहितीनुसार, चारही जणांनी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिची हत्या करून मृतदेह मोकळ्या जागेत टाकण्यात आला. या प्रकरणात १९ वर्षीय शिवम उर्फ सुदामा याला अटक करण्यात आली असून, १६ आणि १७ वर्षे वयाच्या तीन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे.

कुशक रोडजवळ मृतदेह

१३ सप्टेंबरच्या सकाळी कुशक रोडजवळील शेतात मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी नसल्याने सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटवणेही पोलिसांसमोर आव्हान होते. वैद्यकीय आणि फॉरेन्सिक तपासणीनंतर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर खून, पुरावे नष्ट करणे आणि अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारासंदर्भात भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा: Mumbai: पुण्याचा व्यावसायिक मुंबई विमानतळावरून गायब; मलेशिया ट्रिप रद्द, फोन बंद, परतताच उलगडलं रहस्य

५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले

घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी नसल्याने पोलिसांनी परिसरातील आणि संबंधित मार्गांवरील ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या फुटेजमध्ये घटनेच्या वेळेच्या आसपास एक संशयित टेम्पो दिसून आला. अंधारामुळे सुरुवातीला त्याचा क्रमांक स्पष्ट दिसत नव्हता. मात्र, पोलिसांनी टेम्पोचा माग काढत त्याला खड्डा कॉलनी परिसरात शोधून काढले. त्यानंतर तपासाची दिशा स्पष्ट झाली. पोलिसांनी टेम्पो चालकाची चौकशी केल्यानंतर संशयितांपर्यंत पोहोचल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तपासादरम्यान दोन चाकू आणि आरोपींनी कथितरित्या वापरलेले कपडेही जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. या गुन्ह्यातील प्रत्येक आरोपीची भूमिका आणि घटनेचा नेमका घटनाक्रम याबाबत पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Delhi swaroop nagar minor girl gang rape murder four held

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • a minor girl
  • crime news delhi
  • delhi
  • Delhi Police
  • POCSO
  • Rape on Minor Girl

संबंधित बातम्या

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
1

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?
2

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान पहिल्या टी-20 वर पावसाचे सावट? सामना रद्द होणार? कसे असेल दिल्लीचे हवामान
3

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान पहिल्या टी-20 वर पावसाचे सावट? सामना रद्द होणार? कसे असेल दिल्लीचे हवामान

BRICS Summit 2026 : भारत मंडपम येथे जागतिक नेत्यांचे भव्य फोटोसेशन; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले परदेशी पाहुण्यांचे स्वागत
4

BRICS Summit 2026 : भारत मंडपम येथे जागतिक नेत्यांचे भव्य फोटोसेशन; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले परदेशी पाहुण्यांचे स्वागत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.