
Cockroach Janta Party, CJP Shivaji Park Protest, Abhijieet Dipke
उच्च न्यायालयाच्या २०१३ च्या आदेशानुसार हा परिसर सायलेंस झोन असल्याचे तसेच सुरक्षेसह वाहतूक कोंडी व ध्वनिप्रदूषणाचा धोका असल्याचे कारण पोलिसांनी दिले आहे. मात्र, CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पोलिसांचा हा निर्णय फेटाळून लावत नियोजित वेळेतच आंदोलन करण्याचा आणि प्रसंगी ‘जेल भरो’ आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या २०१३ च्या आदेशानुसार शिवाजी पार्क परिसर हा सायलन्स झोन घोषित करण्यात आला आहे. दादर व शिवाजी पार्क परिसर हा शहरातील मध्यवर्ती भाग असल्यामुळे या आंदोनामुळे या भागात मोठी वाहतूक कोंडी निर्माण होण्याची आणि ध्वनिप्रदूषण होऊन स्थानिक रहिवाशांना नाहक त्रास होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली असलीत तरी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दीपके यांनी आपले आंदोलन नियोजित वेळेतच होईल. असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. “न्यायालयाचा आदेश किंवा पोलिसी बळाचा वापर करून आमचा आवाज दाबता येणार नाही,” असा इशारा अभिजित दीपके यांनी दिला.
पोलिसांनी अडवल्यास प्रसंगी शिवाजी पार्क परिसरातच सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी ‘जेल भरो’ आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी शिवाजी पार्क मैदानाच्या सर्व प्रवेशद्वारांवर आणि मुख्य रस्त्यांवर कडक नाकाबंदी लागू केली आहे. आंदोलनकर्त्यांना मैदानात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी अतिरिक्त पोलीस तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
“शिवाजी पार्क हा न्यायालयीन आदेशानुसार सायलन्स झोन आहे. परवानगी नसताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास आंदोलकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.” अशा सुचना पोलिसांकडून जारी करण्यात आल्या आहेत.
या वादाच्या पार्श्वभूमीवर वसईतील वकील संघटनेने (Vasai Lawyers Association) आंदोलकांना कायदेशीर पाठिंबा जाहीर करत, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्यास न्यायालयात विनामूल्य वकीलपत्र घेण्याची घोषणा केल्याने मुंबई आणि वसई परिसरातील राजकीय व सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे.