Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amit Shah : अमित शाहांनी केला नक्षलवाद्यांचा उल्लेख ‘भाई’ ; कॉंग्रेस नेत्यांनी घेतली आक्रमक भूमिका

अमित शाह यांनी छत्तीसगडमध्ये भाषण करताना नक्षलवाद संपवण्यासाठी मुख्य प्रवाहामध्ये येण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांनी नक्षलवाद्यांचा उल्लेख भाऊ म्हणून केल्याने कॉंग्रेस आक्रमक झाली.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 06, 2025 | 06:58 PM
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

Follow Us
Close
Follow Us:

छत्तीसगड : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या एका विधानावरून काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. अमित शाह यांनी नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहामध्ये येण्याचे आवाहन करताना त्यांचा उल्लेख ‘भाई’ असा केला. यामुळे आता राजकारण तापले आहे. अमित शाह यांच्या या उल्लेखावरुन प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते धनंजय सिंह ठाकूर म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद्यांना आपले आणि भाऊ असे संबोधून नक्षलवाद्यांशी लढणाऱ्या आपल्या सैनिकांचे मनोबल तोडण्याचे काम केले आहे. काँग्रेस नेत्याने म्हटले आहे की, त्यांनी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या आपल्या सैनिकांचा, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या आपल्या निष्पाप नागरिकांचा आणि झीरम घाटी घटनेत शहीद झालेल्या काँग्रेस नेत्यांचा अपमान केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

काँग्रेस नेते धनंजय सिंह ठाकूर पुढे म्हणाले की, “अमित शहा यांचे भाषण अत्यंत निंदनीय आणि आक्षेपार्ह आहे. भाजप नेत्यांच्या अशा विधानांमुळे हिंसाचार करणाऱ्या आणि दहशत पसरवणाऱ्यांनाच बळ मिळते. नक्षलवाद्यांना भाऊ संबोधल्याबद्दल अमित शहा आणि भाजपने शहीद सैनिकांच्या कुटुंबियांची आणि राज्यातील नागरिकांची माफी मागावी,” अशी मागणी कॉंग्रेसकडून केली जात आहे.

नक्षलवादावर राजकारणाचे आरोप

गृहमंत्री अमित शहा नक्षलवादाच्या नावाखाली राजकारण करत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राजकीय वैमनस्यातून नक्षलवादाच्या मुद्द्यावर चुकीचे विधान केले आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. दुसऱ्या एका काँग्रेस नेत्याने म्हटले की, केंद्रीय गृहमंत्र्यांना चुकीचे विधान करणे शोभत नाही.

#WATCH | दंतेवाड़ा, छत्तीसगढ़: केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने कहा, “अब वह समय चला गया जब यहां गोलियां चलती थीं और बम धमाके होते थे। मैं उन सभी लोगों से, जिनके हाथ में हथियार हैं, सभी नक्सली भाइयों से, हथियार छोड़ने का आग्रह करने आया हूं। जब कोई नक्सली मारा जाता है तो कोई खुश… pic.twitter.com/DvUKVSQEOp — ANI_HindiNews (@AHindinews) April 5, 2025

महाराष्ट्रासंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

काय म्हणाले अमित शहा ?

सोशल मीडियावर अमित शाह यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. केंद्रीय नेते अमित शहा यांनी दंतेवाडा येथे याबाबत वक्तव्य केले होते. अमित शाह म्हणाले होते की, आता तो काळ गेला आहे जेव्हा येथे गोळ्या झाडल्या जायच्या आणि बॉम्बस्फोट व्हायच्या. ज्यांच्या हातात शस्त्रे आहेत, सर्व नक्षलवादी बांधवांनी, त्यांनी शस्त्रे सोडून द्यावीत अशी विनंती करण्यासाठी मी आलो आहे. जेव्हा एखादा नक्षलवादी मारला जातो तेव्हा कोणीही आनंदी नसते, परंतु या भागाला विकासाची गरज आहे… विष्णू देव साई आणि विजय शर्मा यांनी घोषणा केली आहे की प्रत्येक नक्षलवादी आत्मसमर्पण करेल त्या गावाला नक्षलमुक्त घोषित केले जाईल आणि विकास निधी म्हणून 1 कोटी रुपये दिले जातील… मुख्य प्रवाहात सामील व्हा, भारत सरकार आणि छत्तीसगड सरकार तुम्हाला पूर्ण संरक्षण देईल, असे आवाहन अमित शाह यांनी नक्षलवाद्यांना केले. यामुळे मात्र कॉंग्रेसने भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title: Congress attacks amit shah for referring to naxalites as brother in chhattisgarh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2025 | 06:58 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Congress
  • Naxalist

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?
1

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा
2

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली
3

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका
4

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.