शक्तीशाली भाजप पक्ष स्थापना दिन जाणून घ्या 06 एप्रिलचा इतिहास (फोटो - टीम नवराष्ट्र)
भारतावर संपूर्ण दशक राजकीय सत्ता कायम ठेवणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष. भाजपने फक्त देशामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये शक्तीशाली आणि बलशाली अशी ओळख निर्माण केली आहे. भाजप हा सध्याच्या स्थितीला जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिवस आहे. भाजपची स्थापना ६ एप्रिल १९८० रोजी झाली. चार दशाकांहून अधिक काळापासून भाजप भारतीय राजकारणात सक्रीय आहे. चार दशकांत भाजपने लोकसभेत २ जागांवरून ३०३ जागांपर्यंतचा मोठा पल्ला गाठला आहे. अटल बिहारी वाजपेयींपासून लालकृष्ण अडवाणी यांच्या जोडीपासून ते मोदी-शहा जोडीपर्यंत, पक्षाने प्रत्येक दशकात नवीन उंची गाठली.