Congress vijay wadettiwar target shivsena uddhav thackeray on sudhakar badgujar political news
नागपूर : राज्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतला जात आहे. ठाकरे गटातून नाशिकचे नेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांनी भाजप नेत्यांच्या भेटी घेतल्या असल्याचा आरोप केल्यानंतर ही कारवाई पक्षातून करण्यात आली आहे. तसेच बडगुजर यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या कार्यावर नाराजी व्यक्त केली होती. खासदार संजय राऊत यांनी नाशिक दौरा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यावरुन आता कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे.
विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. विजय वडेट्टीवार यांनी नागपूर महापालिका निवडणूकाबाबत मत मांडले. ते म्हणाले की, “सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्य हे समीकरण भाजपला चांगलं जमलं आहे, जे काही प्रश्न नागपूर महानगरपालिकेत प्रलंबित आहेत ते आम्ही दाखवू, किती भ्रष्टाचार झाला नागपूर शहराची स्थिती काय आहे हे सगळं आम्ही दाखवू. केंद्रीय मंत्री नागपुरातील आहेत, मुख्यमंत्री त्यांना तयार करावी लागत आहे यातून हेच दिसून येत आहे,” असा टोला विजय वडेट्टीवार यांनी भाजपला लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर पक्षामध्ये संशयास्पद हालचाली करणाऱ्या आणि पक्ष विरोधी कारवाई करणाऱ्या बडगुजर यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. यापूर्वी शिवसेना पक्षामध्ये नाराज नेत्यांच्या बंडाचा मोठा फटका बसला आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना पक्षाचे दोन गट झाले. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या हातातून पक्ष निसटला. तसेच पक्षाचे नाव आणि चिन्ह देखील गेले. यामुळे उद्धव ठाकरे यांचे राजकीय मोठे नुकसान झाले. यावरुन टोला लगावताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, “पक्षविरोधी कार्यवाही केल्यामुळे त्यांनी निर्णय घेतला असेल, तो ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रश्न आहे, पण शिवसेनेला आता शहाणपण सुचलं की जो थोडीही वाकडी चाल चालतो त्याला बाजूला केलं तर शिवसेनेची ही स्थिती झाली नसती,” असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “जनगणनेची घोषणा करायची गरज काय होते, खरंतर या देशात ओबीसी हा एक मोठा प्रवर्ग आहे आणि यालाच सत्तेचा वापर करून भाजप सत्तेत आली आहे परंतु या समाजाकडे पूर्णतः ओबीसींकडे दुर्लक्ष आहे. अनेक उदाहरणे देता येतील काहीतरी थातूरमातूर दाखवायचं आणि त्यांचा वापर करायचा. ओबीसींच्या जनगणनेची मुळात मागणी ही राहुल गांधी यांची होती, सरकारने घाबरून जनगणनेची घोषणा केली. जर जनगणना करायची आहे तर मग 27 ची वाट कशाला बघायचे, ओबीसींचा वापर करून 29 च्या निवडणुकांवर डोळा ठेवून करायची आहे का? त्यांनी घोषणा केल्याप्रमाणे या वर्षातच 25 मध्येच या संपूर्ण 26 मध्ये जातीय जनगणना झाली असते, पण सरकारच्या मनात खोट आहे, हे खोटारडे सरकार आहे. लबाडाचं जेवण खाल्ल्याशिवाय काही नाही. त्यामुळे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्हाला विश्वास नाही,” असे स्पष्ट मत कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.