
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान नुकतेच पार पडले. त्यानंतर आता या निवडणुकीचे निकाल आज जाहीर केले जाणार आहे. मतमोजणीला सकाळी साडेआठपासून सुरुवात झाली आहे. दुपारपर्यंत बिहारमध्ये कोणाची सत्ता हे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. हे निकाल बिहार निवडणुकीसाठी असले तरी संपूर्ण देशाची त्याकडे नजर आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या कलांवरून एनडीएला आघाडी मिळत असल्याचे दिसून येते. बिहारच्या सत्तेच्या खुर्चीवर कोण हे निश्चित होणार आहे. एनडीए आणि महागठबंधन या दोन्ही आघाड्यांमध्ये प्रमुख लढत होत आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यात चुरशीची लढत आहे. राज्यातील २४३ जागांसाठी दोन टप्प्यात झालेल्या मतांची मोजणी ४६ मतदान केंद्रांवर सुरू आहे. नितीश कुमार यांनी उत्साहाने विजयाची घोषणा केली आहे, तर तेजस्वी यादव यांनी १८ नोव्हेंबर रोजी शपथ घेण्याचा दावाही केला आहे.
एक्झिट पोलनुसार एनडीएला महिला आणि ओबीसींचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलनुसार, एनडीएला महिला, ओबीसी आणि ईबीसींचा जोरदार पाठिंबा मिळाला आहे. नितीश कुमार सत्ता टिकवून ठेवतील की तेजस्वी बिहारच्या भविष्यासाठी एक नवीन इतिहास लिहितील हे निवडणूक निकालांवरून ठरेल.
प्रथम पोस्टल मतमोजणी
प्रथम पोस्टल मतपत्रिका मोजल्या जात आहेत, त्यानंतर ईव्हीएम मतमोजणी होणार आहे. २४३ जागांवर बहुमतासाठी १२२ जागांची आवश्यकता आहे. मतमोजणी पाहता, प्रशासनाने सर्व जिल्ह्यांमध्ये आवश्यक सुरक्षा व्यवस्था केली आहे. निवडणूक आयोगानेही आवश्यक ती सर्व तयारी केली आहे.