आजच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर
14 Nov 2025 08:12 AM (IST)
राज्यात एकूण 243 विधानसभा जागा आहेत. बिहारमध्ये सरकार स्थापनेसाठी 122 आमदारांची गरज भासणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी संपले. 20 जिल्ह्यांमधील 122 जागांवर मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 68.42 टक्के मतदान झाले.
14 Nov 2025 08:03 AM (IST)
एनडीएला 2020 मध्ये 132 जागा मिळाल्या होत्या. तर, महागठबंधन बहुमतापासून दूर राहिलं होतं. राजदला 75 जागा, काँग्रेसला 19 आणि सीपीआये माले पक्षाला 12 जागांवर विजय मिळाला होता. मात्र, आता या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे.
14 Nov 2025 07:54 AM (IST)
बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यातील 121 मतदारसंघात 65.08 टक्के मतदान पार पडलं आहे. गेल्यावेळी पहिल्या टप्प्यात 57.29 टक्के मतदान झालं. तर, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यात 20 जिल्ह्यातील 122 जागांवर 68.76 टक्के मतदान झालं आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये एकूण 66.91 टक्के मतदान झालं आहे.
14 Nov 2025 07:43 AM (IST)
सर्व गरीब लोकांचे, सर्व कामगारांचे, कामगार वर्गाचे, कमी उत्पन्न गटांचे आणि आंबेडकरांच्या विचारसरणीचे पालन करणाऱ्या सर्वांचं सरकार येत आहे. सकाळी अकरापर्यंत तुम्हाला महागठबंधन सरकार स्थापन करताना दिसेल, असे विकासशील इन्सान पक्षाचे प्रवक्ते देव ज्योती यांनी म्हटले आहे.
14 Nov 2025 07:34 AM (IST)
ईव्हीएम आणि संपूर्ण कर्मचाऱ्यांचा वापर ज्या पद्धतीनं केला जातो, त्याच पद्धतीनं निकाल येतात ते निरर्थक आहे. हे फार काळ टिकणार नाही. कारण देशातील जनतेला त्यांची फसवणूक होत असल्याचं समजलं आहे. निवडणूक आयोग त्यांच्यावर सर्वात मोठा आघात करत आहे, तो म्हणजे त्यांना मतदानाचा संवैधानिक अधिकार हिरावून घेतला जात आहे.
14 Nov 2025 07:24 AM (IST)
बिहारमधील जनतेने मोठ्या संख्येनं मतदान केले. त्यामुळे या निवडणुकीत चांगली रंगत येणार आहे. त्यातच एनडीए सर्व जागांवर आघाडी घेईल आणि बिहारमध्ये पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन होईल, असे मंत्री प्रेम कुमार यांनी म्हटले आहे.
14 Nov 2025 07:19 AM (IST)
बिहार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश राम यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. 'मतमोजणी जर निष्पक्ष झाली तर आपण सरकार स्थापन करू. अखिल भारतीय आघाडीच्या सदस्यांनी चांगले लढा दिला. आज या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल', असे राजेश राम यांनी म्हटले आहे.
14 Nov 2025 07:13 AM (IST)
"लोकशाहीच्या महान उत्सवाचा आज सर्वात ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा दिवस आहे. आजचे निकाल केवळ बिहारसाठीच नाही तर देशासाठी शुभ असतील. बिहार एक उदाहरण निर्माण करेल. जनताच मालक आहे, जनताच निर्णय घेईल. बिहारचे लोक या घराणेशाही लोकांचा...जंगलराजचे राजपुत्र, त्यांची जमीनदारी कधीही स्वीकारणार नाहीत'', असे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी म्हटले आहे.
Bihar Election Result 2025 Today live नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान नुकतेच पार पडले. त्यानंतर आता या निवडणुकीचे निकाल आज जाहीर केले जाणार आहे. मतमोजणीला सकाळी आठपासून सुरुवात होणार असून, हळूहळू या निवडणुकीचे चित्र समोर येणार आहे. दुपारपर्यंत बिहारमध्ये कोण विजयी ? हे स्पष्ट होईल.
बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान घेण्यात आले. या निकालाला राजकीय घडामोडींमध्ये एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट म्हटले जात आहे. म्हणूनच इतर पक्षांबरोबरच भाजपाचेही या निवडणूक निकालांकडे डोळे लागले आहेत. ही निवडणूक भाजपासाठी महत्त्वाची आहे कारण ती बिहारमध्ये एनडीएमध्ये मोठा भाऊ कोण असेल? हे ठरवेल, भाजपा ही जागा जिंकेल का की जेडीयू पुन्हा एकदा ताकद मिळवून पूर्वीचे स्थान परत मिळवेल ? काही सर्वेक्षणांनी भाकित केले आहे की भाजपा तिसरा सर्वांत मोठा पक्ष बनेल आणि आरजेडी पहिला सर्वात मोठा पक्ष बनेल. ज्यामुळे देशात उत्सुकता निर्माण झाली आहे.
या निवडणुकीमुळे चिराग पासवान यांच्या पक्षाची कामगिरी सिद्ध होईल, ज्यांनी लोकसभा निवडणुकीत पाचही जागा जिंकल्या. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा १००% स्ट्राइक रेट होता असा त्यांचा सातत्याने दावा आहे. यामुळे ते अप्रत्यक्षपणे स्वतःला बिहारचे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहात आहेत.






