Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: दहिवडी नगरपंचायतीत सोनिया गोरेंची राजकीय मुत्सद्देगिरी; सर्व सभापती पदांच्या निवडी बिनविरोध

सभापती निवडीसाठी आज प्रांताधिकारी तथा पीठासन अधिकारी उज्वला गाडेकर आणि मुख्याधिकारी संदीप घार्गे यांच्या उपस्थितीत विशेष बैठक पार पडली. सुरुवातीला सभापती पदांवरून तिन्ही गटांमध्ये मतभेद होते.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 18, 2026 | 05:00 PM
Dahiwadi, Nagar Panchayat, Sonia Gore, Maharashtra Politics,

Dahiwadi, Nagar Panchayat, Sonia Gore, Maharashtra Politics,

Follow Us
Follow Us:
  • दहिवडी नगरपंचायतीच्या भाजप नेत्या सोनिया गोरे यांच्या मध्यस्थीने सर्व जागांवर बिनविरोध निवड
  • सत्ताधारी आणि विरोधक अशा तिन्ही गटांना समान प्रतिनिधित्व देत प्रत्येकी एक सभापती पद
  • नवीन निवडीनुसार सुरेंद्र मोरे, रुपेश मोरे आणि विजया जाधव यांची सभापतीपदी नियुक्ती
Dahiwadi Nagar Panchayat News: दहिवडी नगरपंचायतीतील सभापती निवड प्रक्रियेत अखेर राजकीय पेचप्रसंगाला पूर्णविराम मिळत, तिन्ही गटांना समान प्रतिनिधित्व देत सर्व सभापती निवडी बिनविरोध पार पडल्या. भाजप नेत्या सोनिया गोरे यांनी दाखवलेल्या राजकीय मुत्सद्देगिरीच्या चातुर्यामुळे विरोधकांनाही सोबत घेत ‘विन-विन’ फॉर्म्युला राबवण्यात आला आणि संपूर्ण राजकीय समीकरणच बदलून गेले.

सभापती निवडीसाठी आज प्रांताधिकारी तथा पीठासन अधिकारी उज्वला गाडेकर आणि मुख्याधिकारी संदीप घार्गे यांच्या उपस्थितीत विशेष बैठक पार पडली. सुरुवातीला सभापती पदांवरून तिन्ही गटांमध्ये मतभेद होते. सभापती पदावरून एकमत होत नव्हते. मात्र, शेवटच्या क्षणी सोनिया गोरे यांनी स्वतः पुढाकार घेत सर्वांना समान संधी देण्याचा प्रस्ताव मांडला आणि त्यावर एकमत घडवून आणले. यामध्ये नगराध्यक्षा वर्षाराणी सावंत यांच्याकडे पदसिद्ध स्थायी समिती सभापतीपद कायम ठेवण्यात आले, तर उपनगराध्यक्षा सुरेखाताई पखाले यांच्याकडे पाणीपुरवठा सभापतीपद कायम राहिले.

Sangali Zilla Parishad महाविकास आघाडीचा झेंडा; संगीता पाटील अध्यक्ष, ऋषीकेश लाड उपाध्यक्ष

त्यानंतर उर्वरित सभापती पदांची निवड पुढीलप्रमाणे बिनविरोध करण्यात आली —
स्वच्छता व आरोग्य सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेंद्र मोरे
बांधकाम सभापतीपदी भाजपचे रुपेश मोरे
महिला व बालकल्याण सभापतीपदी शेखरभाऊ गोरे गटाच्या विजया जाधव
तिन्ही गटांना प्रत्येकी एक सभापती पद देत समतोल साधल्याने कोणताही वाद न होता निवड प्रक्रिया सुरळीत पार पडली.

विशेष म्हणजे, आधी तणावपूर्ण असलेले वातावरण सोनिया गोरे यांच्या हस्तक्षेपानंतर पूर्णपणे बदलले. विरोधी गटांनाही विश्वासात घेत त्यांनी ‘एकत्रित विकास’चा मंत्र दिला. त्यांच्या या राजकीय कौशल्याची शहरभर चर्चा रंगली असून, नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. यावेळी बोलताना सोनिया गोरे यांनी, “सर्वांनी मतभेद विसरून दहिवडी शहराच्या विकासासाठी एकदिलाने काम करावे व दहिवडी चा कायापालट करावा,” असे आवाहन केले.

चैत्र नवरात्री उत्सवा दरम्यान उपवास करताना ‘या’ पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी, शरीराला मिळेल ऊर्जा

सर्व नवीन सभापतींचा सत्कार ही सोनिया गोरे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक महेश जाधव यांनी केले. यावेळी भाजप नेते अतुल जाधव, बाळासाहेब सावंत, शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्यासह सर्व नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Web Title: Dahiwadi nagar panchayat all chairperson elections held unopposed with win win formula

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • BJP Politics
  • nagar panchayat elections
  • Satara Politics

संबंधित बातम्या

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
1

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

Pune MLC Election 2026: पुणे पदवीधरसाठी भाजप कोणाला देणार संधी?! महाविकास आघाडीतही इच्छुकांची रांग
2

Pune MLC Election 2026: पुणे पदवीधरसाठी भाजप कोणाला देणार संधी?! महाविकास आघाडीतही इच्छुकांची रांग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.