
DCM Ajit Pawar Press Confernce pune live news on PMC Elections 2025
Ajit Pawar Live : पुणे : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Local Body Elections) रणधुमाळी सुरु आहे. पुण्यामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे पुणे दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी आज भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्या ऐतिहासिक लढाईतील शूरवीरांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असून पुण्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.
काय म्हणाले अजित पवार?
माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, “आज मी अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. थंडी खूप आहे.सर्व निधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे सूचना जे आहे ते देण्यात आलेले आहेत. चांगल्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केली आहे. दुपार नंतर गर्दी वाढेल. महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे आचारसंहिता आहे,” असे अजित पवार म्हणाले.
हे देखील वाचा : पुन्हा दिसणार ठाकरेंचा बाणा! उद्धव – राज यांच्या एकत्रित सभांचा घुमणार आवाज
पुढे ते म्हणाले की, “महानगरपालिकेच्या आचारसंहिता सुरू आहे. आचारसंहितेमुळे कुठली अडचण निर्माण होईल ती होता कामा नये. तो निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. निवडणूक आयोग त्याबाबतचा निर्णय घेईल. विदर्भातील जिल्हा परिषद उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद कोकणातील जिल्हा परिषद पन्नास टक्के पेक्षा जास्त आरक्षण असणाऱ्या जिल्हा परिषद आहेत. आरक्षण 50 टक्के पर्यंतच घ्या अशा सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. 50% च्या आत असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आधी होतील. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रभागातील जागा वाटपाचा तिढा सुटेल. ज्या ठिकाणी एबी फॉर्म जागा गेले आहेत त्या ठिकाणी मागे घेण्यात येतील,” असे देखील अजित पवार म्हणाले आहेत.
हे देखील वाचा : शिंदे गटाच्या नेत्याने आपल्या पक्षातील उमेदावाचा एबी फॉर्म थेट टाकला खाऊन; पुण्यातील धक्कादायक प्रकार
त्याचबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून गुन्हेगारीतील आरोपींना उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये कोमकर हत्या प्रकरणातील सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर तसेच गज्या मारणेची बायको जयश्री मारणे या तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. याबाबत अजित पवार म्हणाले की, “तुम्ही आत्तपर्यंतच्या सर्व निवडणूका आठवा. आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात यांच्याबरोबर युती झालेली आहे. काही जागा आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. आम्ही ज्यांच्या बरोबर युती करतो त्यांनी त्या जागा कुणाला द्यायच्या हा त्यांचा अधिकार आहे. याबाबत मी एक पत्रकार परिषद घेणार आहे,” अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे.