Karuna Munde praised Dhananjay Munde's politics
बीड : राज्याचे मंत्री व अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात आवाज उठवला होता. यामध्ये करुणा मुंडे यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. कोर्टाने मंत्री धनंजय मुंडे घरगुती हिंसाचारामध्ये दोषी ठरवले आहे. करुणा मुंडे यांनी दरमहा 15 लाख रुपये पोटगी देण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टाने दिलासा दिल्यानंतर करुणा मुंडे यांना दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने मंत्री धनंजय मुंडे यांना दिले आहे. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. कोर्टाने धनंजय मुंडे यांना मोठा धक्का दिला असून यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
धनंजय मुंडे यांच्या पूर्व पत्नी करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप केले होते. घरगुती हिंसाचाराचे आरोप करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप केले होते. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात कौटुंबिक न्यायालयामध्ये हिंसाचाराची केस दाखल केली होती. यामध्ये कोर्टाने धनंजय मुंडे यांना धक्का दिला आहे. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडेंना दोषी ठरवले आहे. करुणा मुंडे यांचे आरोप कोर्टाने स्वीकारले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
धनंजय मुंडे यांच्या पूर्व पत्नी करुणा मुंडे यांनी एका वाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कौटुंबिक न्यायालयाचे आभार मानले आहेत. करुणा मुंडे म्हणाल्या की, “न्यायालयाचे मी खूप आभार मानते. आज सत्याचा विजय झाला आहे. लोकांना असं वाटतं की कोर्टामध्ये न्याय मिळत नाही, पण मला न्याय मिळाला आहे. औरंगाबाद कोर्टामध्ये देखील माझा विजय झाला होता. आता वांद्रे कौटुंबिक न्यायालयामध्ये देखील माझा विजय झाला आहे. त्यामुळे न्यायालयाचे आणि न्यायाधीश यांचे आभार मानते,” असे मत करुणा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
पोटगीबाबत देखील करुणा मुंडे यांनी मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या की, “माझ्यासोबत माझी मुलं बाळं राहतात. आम्हाला तिघांना पाच पाच लाख तरी मिळतील म्हणून 15 लाखांची मागणी होती. मात्र आम्हाला कोर्टाकडून दोन लाख मिळाले आहेत. त्यामुळे पोटगी जास्त मिळावी म्हणून मी या ऑर्डरच्या विरोधात हाय कोर्टामध्ये जाणार आहे,” असा आक्रमक पवित्रा करुणा मुंडे यांनी घेतला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
करुणा मुंडे यांनी भावनिक होत आपल्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणाल्या की, “महिलांना खूप त्रास आहे. फक्त पोटगीसाठी मागील तीन वर्षापासून मी लढत आहे. मी सांगू शकत नाही की मला किती त्रास झाला आहे. आपला नवरा जेव्हा मोठ्या पदावर आहे. संपूर्ण सिस्टीम त्यांच्यासोबत आहे तेव्हा ही लढाई अजून अवघड होते. माझी लढाई ही एका मंत्र्याविरोधात होती. हा काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. माझ्या वकिलांसमोर खूप मोठे मोठे वकील होते. पण अखेर विजय हा सत्याचा झाला. मी धनंजय मुंडे यांची पत्नी नाहीच असे त्यांचे वकील म्हणत होते. मात्र मी त्यांची पहिली पत्नी आहे,” असे म्हणत करुणा मुंडे या भावनिक झाल्या आहेत.