आणीबाणीत ज्यांनी वर्तमानपत्र बंद पाडलं त्यांचा मुलगा आज भाजपात; शंकररावांवरून संजय राऊतांचा पलटवार
मुंबई : महायुतीचे सरकार स्थापन होऊन दोन महिने झाले आहेत. तरी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राहायला न गेल्यामुळे राजकारण तापले आहे. वर्षा बंगल्यावर कामाख्या देवीला कापलेले रेड्याची शिंग पुरली गेली असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. यावरुन जोरदार राजकारण रंगले असून शिंदे गटाने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आता पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. कामाख्या मंदिर आणि वर्षा बंगल्यावर रेड्याची शिंगं पुरल्याचे आपले वक्तव्य समजून घेण्यासाठी माणसाला साक्षर असणे आवश्यक आहे, इमानदार असणे गरजेचे आहे, असा टोला त्यांनी शिंदेंच्या शिलेदारांना लगावला. शिंदे सेनेने कामाख्याला जाऊन अघोरी विधी केलेत की नाही, याच्यावर कोणीच उत्तर देत नसल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे खासदार राऊत म्हणाले की, “अघोरी विद्या ही अंधश्रद्धा कायद्याच्या विरोधात असताना सुद्धा असे काम झाले असेल तर ते राज्याच्या पुरागोमी विचारधारेच्या विरोधात आहे. लोकांनी सॉक्रेटिस, महात्मा फुले यांच्यासह महापुरूषांनाही वेगळी भूमिका मांडली म्हणून वेडे ठरवले. तसे मलाही ठरवत आहे. मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन राज्य कारभार करावा ही जनतेची अपेक्षा आहे, असे ते म्हणाले. जर ही एक नागरीक म्हणून आमची चिंता असेल तर शिरसाट यांना डिप्रेशनमध्ये जाण्याची गरज नाही,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस यांना वर्षा बंगल्यावर राहायला जाण्याचा सल्ला दिला आहे. खासदार राऊत म्हणाले की, “राज्यात अंधश्रद्धा विरोधी कायदा आहे. त्याविषयी काम करणारे अनेक जण आहेत. अनेक संघटना आहेत. वर्षा बंगल्यावर अंधश्रद्धेतून रेड्याची शिंगे पुरल्याची चर्चा होत आहे, ही मोठी गंभीर बाब आहे. त्याविषयीची चर्चा झाली पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच सांगितले की ते मुलीची दहावीची परीक्षा झाली की वर्षा बंगल्यावर राहायला जाणार आहे. त्यांनी खरंच तिथे राहायला जायला हवे,” असे आवाहन खासदार संजय राऊतांनी केले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांना याबाबत प्रश्न करण्यात आला. यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “मला असं वाटतं की अलिकडच्या काळात काही बाबतीत मीडिया वेड्यांचा बाजार होतोय. माफ करा, पण स्पष्ट सांगतो. आज मी एका माध्यमांवर पाहतो होतो की वर्षा पाडणार? काय वेड्यांचा बाजार आहे? वर्षा ही काय कोणाच्या घरची मालमत्ता आहे का? असं आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थान सोडल्यानंतर त्या ठिकाणी मला जायचं आहे. पण त्यापूर्वी त्या ठिकाणी काही छोटी-मोठी कामे सुरु होती. दरम्यानच्या काळातच माझी मुलगी १० वीत आहे. १७ तारखेपासून तीची परीक्षा सुरु आहे. त्यामुळे ती म्हणाली की माझी परीक्षा झाल्यानंतर आपण तिकडे शिफ्ट होऊ, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षावरून सुरू झालेल्या राजकारणावर पडदा टाकला.