Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“देवाची काठी लागत नाही पण….; धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया

अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. यावर आता भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुरेश धस यांनी उशीरा का होईना न्याय मिळतो असे मत व्यक्त केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 04, 2025 | 01:00 PM
Dhananjay Munde Resignation BJP MLA Suresh Dhas Reaction Maharashtra Political News

Dhananjay Munde Resignation BJP MLA Suresh Dhas Reaction Maharashtra Political News

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये मोठी घटना घडली आहे. अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. बीड हत्या प्रकरणामुळे त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात होती. विरोधकांसह सत्ताधारी नेत्यांनी देखील धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांची लाखोली वाहिली होती. यामध्ये भाजप नेते व आमदार सुरेश धस हे अग्रेसर होते. सुरेश धस यांनी धनंजय मुंडे आणि आरोपी वाल्मिक कराड यांच्यामध्ये संबंध असल्याचा आरोप अन् पुरावे दिले होते. अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज (दि.04) अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. मात्र कामकाज सुरु होण्यापूर्वीच धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. यावर आता आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार सुरेश धस म्हणाले की, “देवाची काठी लागत नाही, परंतु न्याय मिळतो. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी ठाम भूमिका घेतली. आज तो न्याय दिसला,” अशा शब्दांत आमदार सुरेश धस यांनी राजीनाम्याचे स्वागत केले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

यावेळी आमदार सुरेश धस यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्या सावरगाव येथील सभेतील त्या वक्तव्याची आठवण करून दिली. त्यात वाल्मिक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचे पान सुद्धा हलत नाही, अशा त्या म्हणाल्या होत्या. तोच धागा पकडून धसांनी संतोष देशमुखांच्या हत्येचं पान मुंडेशिवाय परस्पर कसं हललं?” असा सवाल करत मुंडे यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उभं केले आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. तसेच अर्थिक घोटाळे, गुन्हेगारी संबंध अशा अनेक मुद्द्यांवर सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र त्यानंतर भाजप आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाल्यामुळे धस वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. आता धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली होती. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अंजली दमानिया म्हणाल्या की, “धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं कृत्य केलं आहे. त्यांचे महाराष्ट्रावर किती उपकार झाले आहेत. मात्र यांची हकालपट्टी करण्याची ताकद या सरकारमध्ये नाही. यांना बडतर्फ करायला हवं होतं. त्यांना राजकारणातून काढून टाकलं पाहिजे होतं,” अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.

Web Title: Dhananjay munde resignation bjp mla suresh dhas reaction maharashtra political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2025 | 01:00 PM

Topics:  

  • Anjali Damnia
  • Dhnanjay Munde
  • Suresh Dhas

संबंधित बातम्या

“मुंडे कुटुंबाचे राजकारण आता संपले आहे, वंजारी समाजासाठी वेगळे नेतृत्व…; अंजली दमानिया यांचा मोठा दावा
1

“मुंडे कुटुंबाचे राजकारण आता संपले आहे, वंजारी समाजासाठी वेगळे नेतृत्व…; अंजली दमानिया यांचा मोठा दावा

“माझी शांत बसण्याची ही दोनशे दिवसांची ‘डबल सेंचुरी’; शायरीमधून अखेर धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली खदखद
2

“माझी शांत बसण्याची ही दोनशे दिवसांची ‘डबल सेंचुरी’; शायरीमधून अखेर धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली खदखद

आधी टीका आता आला पुळका? करुणा मुंडेंकडून धनंजय मुंडेंचा ‘बाजीराव’ उल्लेख करत तोंडभरुन कौतुक
3

आधी टीका आता आला पुळका? करुणा मुंडेंकडून धनंजय मुंडेंचा ‘बाजीराव’ उल्लेख करत तोंडभरुन कौतुक

बीडच्या कायदा सुव्यवस्थेवरुन सुरेश धस पुन्हा आक्रमक; शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
4

बीडच्या कायदा सुव्यवस्थेवरुन सुरेश धस पुन्हा आक्रमक; शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.