Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘एका आरोपीला पोलिसांनी वाचवलंय का?’ विलास घुले हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप

विलास घुले यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एका आरोपीला अटक न झाल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्याची मागणी केली.

  • By विवेक गायकवाड
Updated On: Jun 26, 2026 | 07:10 PM
'एका आरोपीला पोलिसांनी वाचवलंय का?' विलास घुले हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप

'एका आरोपीला पोलिसांनी वाचवलंय का?' विलास घुले हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप

Follow Us
Follow Us:
  • विलास घुले हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा पोलिसांवर गंभीर आरोप
  • ‘सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे’, असे म्हणत निष्पक्ष तपासाची मागणी
  • प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव चर्चेत
 

बीड जिल्ह्यातील केज येथे घडलेल्या विलास घुले हत्या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. घुले कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, या प्रकरणातील एका संशयित आरोपीला अद्याप अटक का करण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित केला.

मुंडे म्हणाले की, पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली असली तरी आणखी एका व्यक्तीवर संशय व्यक्त केला जात असून त्याच्याविरोधात कारवाई का होत नाही, याचे उत्तर मिळायला हवे. त्यांनी असा आरोप केला की, संबंधित व्यक्तीला बाहेर ठेवून पुरावे नष्ट करण्याची संधी दिली जात आहे.

‘सर्वांना समान न्याय मिळालाच पाहिजे’

धनंजय मुंडे यांनी सांगितले की, या प्रकरणात कोणत्याही जाती-पातीचा किंवा वैयक्तिक वैराचा मुद्दा नाही. मात्र कायद्यापुढे सर्व समान असले पाहिजेत. एका आरोपीसाठी वेगळा आणि दुसऱ्यासाठी वेगळा न्याय असू नये, असे ते म्हणाले.

‘फोडाफोडीची नशा चढली, उद्या फडणवीसांनाही फोडतील’; ‘ऑपरेशन टायगर’वर संजय राऊतांचा पलटवार

बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

एसआयटीकडे तपास; खासदारांच्या मुलाचे नाव चर्चेत

केजमधील हॉटेलमध्ये झालेल्या वादादरम्यान मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या विलास घुले यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास आता आयपीएस अधिकारी वेंकटराम यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपविण्यात आला आहे.

महापालिकेचा कर्मचारी गटारात पडला, पण चौकशी त्याचीच? महापौर रितू तावडेंच्या आदेशावर वर्षा गायकवाडांचा संताप

दरम्यान, या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांचे नावही चर्चेत आले आहे. मृताच्या नातेवाईकांनी त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. मात्र सौरभ सोनवणे यांनी सर्व आरोप फेटाळून लावत, आवश्यक असल्यास आपल्या कॉल रेकॉर्डचीही चौकशी करण्याची तयारी दर्शवली आहे.

Web Title: Dhananjay munde vilas ghule murder case beed police allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 07:10 PM

Topics:  

  • dhananjay munde

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.