Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांगलीचं अखेर ठरलं ! धीरज सूर्यवंशी महापौर तर गजानन मगदूम उपमहापौर

महापालिकेत भाजपला 78 पैकी सर्वाधिक 39 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला 18, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला 16, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 3, शिवसेनेला 2 जागा मिळाल्या आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 04, 2026 | 02:47 PM
सांगलीचं अखेर ठरलं ! धीरज सूर्यवंशी महापौर तर गजानन मगदूम उपमहापौर

सांगलीचं अखेर ठरलं ! धीरज सूर्यवंशी महापौर तर गजानन मगदूम उपमहापौर

Follow Us
Close
Follow Us:

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका महापौरपदासाठी भाजपकडून धीरज सूर्यवंशी यांचे नाव निश्चित झाले आहे. महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार उपमहापौर पद राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला मिळणार आहे. या पदासाठी शहर जिल्हाध्यक्षांकडून गजानन मगदूम यांचा अर्ज भरला जाणार असल्याचे सांगितले.

सांगली येथे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची संयुक्त बैठक आज पार पडली. या बैठकीत भाजपकडून धीरज सूर्यवंशी तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून गजानन मगदूम यांची उपमहापौर पदासाठी सर्वानुमते उमेदवारी निश्चित करण्यात आली.

यावेळी माजी मंत्री आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीरदादा गाडगीळ, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, भाजपा नेत्या जयश्री वहिनी पाटील, शेखर इनामदार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे, गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्यासह दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. महापालिकेत भाजपला 78 पैकी सर्वाधिक 39 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला 18, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला 16, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 3, शिवसेनेला 2 जागा मिळाल्या आहेत. महापालिकेत सत्तास्थापनेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची युती झाली आहे. त्यामुळे संख्याबळ 55 झाले आहे.

हेदेखील वाचा : Maharashtra Politics: कोकणाबाबत एकनाथ शिंदेंचे मोठे विधान; म्हणाले, “लक्ष्मी ऑरगॅनिकसारखे प्रदूषणकारी…”

याशिवाय, शिवसेनाही सोबत आहे. त्यामुळे महायुतीकडे तगडे बहुमत आहे. महायुतीच्या सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यानुसार महापौर पद भाजपला, उपमहापौर पद राष्ट्रवादीला मिळणार आहे. स्थायी समितीचे सभापती पदही भाजपकडेच राहणार आहे. महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी, निरंजन आवटी, अतुल माने, रोहिणी पाटील, स्वाती शिंदे यांचे नाव इच्छुकांच्या यादीत होते. मात्र महापौर पदासाठी पहिले सव्वा वर्ष धीरज सूर्यवंशी यांचे नाव निश्चित झाले आहे.

काँग्रेसमध्ये संभ्रम; एकमत होईना

महापालिकेत भाजप-राष्ट्रवादी अजित पवार युती झाली आहे. या युतीत शिवसेनाही असणार आहे. त्यामुळे महायुतीचे संख्याबळ ५७ होते. विरोधी काँग्रेसकडे 1८ आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे ३, असे एकूण २१ संख्याबळ आहे. काँग्रेसने मंगळवारअखेर महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज नेला नव्हता. महापौर, उपमहापौर या दोन्ही पदांसाठी काँग्रेसनेच उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असा मतप्रवाह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात दिसत आहे. मात्र काँग्रेसचा अजून गटनेताही निश्चित झालेला नाही. महापौर, उपमहापौर पदाचा उमेदवार कोण असणार, हेही निश्चित झालेले नाही. स्थायी समितीत कोण जाणार, स्वीकृत नगरसेवक कोण होणार, हे सर्व निश्चित करूनच गटनेता निवड व्हावी, अशा अटी, शर्तींमुळे काँग्रेसचे घोडे अडले आहे.

“अजित पवार यांच्या निधनाने पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजप विरोधात महापौर निवडीत अर्ज न भरता बिनविरोध निवड करण्यात आली, त्याच प्रमाणे सांगलीतही निवड बिनविरोध व्हावी, असे आवाहन मी काँग्रेसला करणार आहे, याबाबत खासदार विशाल पाटील यांच्याशी बोलणार आहे.

– चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

हेदेखील वाचा : Maharashtra Politics: ‘एनसीपी’च्या 16 नगरसेवकांची विभागीय आयुक्तांकडे नोंदणी; गटनेतेपदी मैनुद्दीन बागवान

Web Title: Dhiraj suryavanshi is mayor and gajanan magdum is deputy mayor in sangli municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • BJP news
  • Sangli Mahanagarpalika
  • sangli news

संबंधित बातम्या

Sangali Zilla Parishad महाविकास आघाडीचा झेंडा; संगीता पाटील अध्यक्ष, ऋषीकेश लाड उपाध्यक्ष
1

Sangali Zilla Parishad महाविकास आघाडीचा झेंडा; संगीता पाटील अध्यक्ष, ऋषीकेश लाड उपाध्यक्ष

Jat Patrakar Bhavan: जतमध्ये ‘पत्रकार भवना’चे थाटात भूमिपूजन; बांधकामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – आ. गोपीचंद पडळकर
2

Jat Patrakar Bhavan: जतमध्ये ‘पत्रकार भवना’चे थाटात भूमिपूजन; बांधकामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – आ. गोपीचंद पडळकर

Sangli News: ‘पीएम सूर्य घर’ योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करा; खासदार विशाल पाटील यांचे महावितरणला निर्देश
3

Sangli News: ‘पीएम सूर्य घर’ योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करा; खासदार विशाल पाटील यांचे महावितरणला निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.