Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DCC Bank Election Result : तीन जिल्हा बँकांचे निकाल जाहीर! सातारा, सांगली, अहिल्यानगरमध्ये कोणाची सत्ता?

DCC Bank Election Result : राज्यातील सातारा, सांगली आणि अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालांनी राज्यातील स्थानिक राजकारणाची नवी समीकरणं समोर आणली आहेत.

  • By विवेक
Updated On: Nov 03, 2026 | 07:18 PM
DCC Bank election result

DCC Bank election result

Follow Us
Follow Us:
  • तीन जिल्हा बँकांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर
  • साताऱ्यात भाजप सर्वाधिक जागांवर विजयी; सत्तेसाठी संघर्ष
  • अहिल्यानगरमध्ये विखे-थोरात पॅनेलचं निर्विवाद वर्चस्व
  • सांगलीत संजय काका पाटील ठरणार किंगमेकर
 

मुंबई : राज्यातील सहकार क्षेत्राचं लक्ष लागून राहिलेल्या सातारा, सांगली आणि अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालांनी राज्यातील स्थानिक राजकारणाची नवी समीकरणं समोर आणली आहेत. अहिल्यानगरमध्ये विखे-थोरात पॅनेलने वर्चस्व मिळवलं, सांगलीत अपक्ष संजय काका पाटील यांच्या विजयामुळे सत्तेची गणितं बदलली, तर साताऱ्यात कोणाची सत्ता येणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. (DCC Bank Election Result)

साताऱ्यात भाजप वरचढ, पण सत्तेचा पेच कायम!

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालकपदांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने ९ जागा जिंकल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ८, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ४ जागा मिळाल्या आहेत.

विशेष म्हणजे, राज्यात महायुतीत एकत्र असलेले हे तिन्ही पक्ष साताऱ्यात मात्र एकमेकांविरोधात लढले. त्यामुळे आता बँकेच्या अध्यक्षपदासाठी कोणते राजकीय समीकरण जुळणार, याकडे लक्ष लागलं आहे.

Satara Dictrict Bank Election : जावळीत शिवेंद्रराजेंच्या निष्ठावंताचा डंका! ज्ञानदेव रांजणे यांचा जिल्हा बँक निवडणुकीत दणदणीत विजय

अहिल्यानगरमध्ये विखे-थोरातांची एकहाती बाजी!

अहिल्यानगर जिल्हा बँकेत राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील सहकार विकास पॅनेलने तब्बल २१ पैकी १८ जागा जिंकल्या आहेत.

भाजप नेते राम शिंदे यांच्या गटाला २ जागा मिळाल्या, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनीही विजय मिळवला आहे. त्यामुळे या जिल्हा बँकेत विखे-थोरात गटाचं वर्चस्व स्पष्ट झालं आहे.

सांगलीत संजय काका पाटील ठरणार किंगमेकर!

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळालं. काँग्रेस आघाडीला ६, भाजपला ५, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ४, शिवसेनेला ३ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला २ जागा मिळाल्या आहेत.

माजी खासदार संजय काका पाटील यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला. विशेष म्हणजे, त्यांचा विजय अवघ्या २ मतांनी झाला. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या ११ जागांच्या गणितात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

एकूणच, तीन जिल्ह्यांतील निकालांनी सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. सातारा आणि सांगलीतील सत्तास्थापनेच्या हालचालींकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे.

Satara District Bank Election: जिल्हा बँकेत भाजप सर्वात मोठा पक्ष; नऊ जागा पटकावून अध्यक्ष पदाची मोर्चेबांधणी

💡

Frequently Asked Questions

  • Que: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?

    Ans: भाजपच्या नेतृत्वाखालील गटाला ९, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ८ आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ४ जागा मिळाल्या.

  • Que: अहिल्यानगर जिल्हा बँकेत कोणत्या पॅनेलचा विजय झाला?

    Ans: राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील सहकार विकास पॅनेलने २१ पैकी १८ जागा जिंकल्या.

  • Que: सांगली जिल्हा बँकेत संजय काका पाटील यांची भूमिका महत्त्वाची का आहे?

    Ans: संजय काका पाटील अपक्ष म्हणून विजयी झाले आहेत. दोन्ही प्रमुख गटांच्या जागांची बेरीज समान असल्याने अध्यक्षपदाच्या निवडीत त्यांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरू शकतो.

Web Title: Dcc bank election result satara sangli ahilyanagar vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 07:15 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • District Bank Election
  • sangli news
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara Dictrict Bank Election : जावळीत शिवेंद्रराजेंच्या निष्ठावंताचा डंका! ज्ञानदेव रांजणे यांचा जिल्हा बँक निवडणुकीत दणदणीत विजय
1

Satara Dictrict Bank Election : जावळीत शिवेंद्रराजेंच्या निष्ठावंताचा डंका! ज्ञानदेव रांजणे यांचा जिल्हा बँक निवडणुकीत दणदणीत विजय

Satara Water Management : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनाचे मोठे निर्णय! मंत्री शंभूराज देसाईंचे महत्त्वाचे निर्देश
2

Satara Water Management : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनाचे मोठे निर्णय! मंत्री शंभूराज देसाईंचे महत्त्वाचे निर्देश

Raju Shetti : ऊसदरासाठी पुणे-बंगळुरू महामार्गावर स्वाभिमानीचा दुहेरी एल्गार! राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर-सांगलीचे श
3

Raju Shetti : ऊसदरासाठी पुणे-बंगळुरू महामार्गावर स्वाभिमानीचा दुहेरी एल्गार! राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर-सांगलीचे श

Satara News : भोसले की गाढवे, खंडाळ्यात कोण मारणार बाजी? जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तिरंगी लढत
4

Satara News : भोसले की गाढवे, खंडाळ्यात कोण मारणार बाजी? जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तिरंगी लढत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.