Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“जाऊ द्या, एकदा नाही म्हणून सांगितलं ना…’; अजित पवारांबाबत प्रश्न विचारताच छगन भुजबळ खवळले

अजित पवार गटाचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या तयारीसाठी साईनगरी शिर्डीमध्ये शिबीर होत आहे. यामध्ये नाराज नेते छगन भुजबळ हे देखील सहभागी झाले असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 18, 2025 | 01:38 PM
अमित शाहांबरोबर राजकीय चर्चा झाली का? छगन भुजबळांनी स्पष्ट सांगितलं

अमित शाहांबरोबर राजकीय चर्चा झाली का? छगन भुजबळांनी स्पष्ट सांगितलं

Follow Us
Follow Us:

शिर्डी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीच्या मित्रपक्षांनी तयारी सुरु केली आहे. पुन्हा एकदा सत्तेमध्ये आल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांचा शिर्डीमध्ये मेळावा होत आहे. भाजपच्या नंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील पुढील निवडणुकीच्या तयारीसाठी ‘नवसंकल्प शिबिर शिर्डीमध्ये सुरु झाले आहे. राज्यातील पक्ष, आघाडी आणि विविध सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यामध्ये नाराज नेते छगन भुजबळ यांनी देखील उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेते हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी मात्र नाराज नेते छगन भुजबळ उपस्थित राहणार का याची सर्वांना उत्सुकता लागली होती. मंत्रीपद न मिळाल्यामुळे ते पक्षांमध्ये नाराज आहेत. त्यांनी अनेकदा आपली नाराजी माध्यमांसमोर व्यक्त देखील केली आहे. छगन भुजबळ हे अजित पवार यांनी संधी न दिल्यामुळे नाराज असल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षाच्या शिबिरामध्ये छगन भुजबळ सहभागी होणार की नाही याची चर्चा रंगली होती. छगन भुजबळ सहभागी झाले असून त्यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला आहे.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

छगन भुजबळ यांना माध्यमांशी संवाद साधताना त्यांना शिबिराला येण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर भुजबळ म्हणाले की, “नाराजी दूर झाली हा मुद्दा येत नाही. हे पक्षाचं शिबीर आहे. कोणाही व्यक्तीचं शिबीर नाही. काल प्रफुल्ल पटेल हे मला येऊन भेटले. त्यांनी दोन तास चर्चा केली. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही थोडावेळ यायला हवं. सुनील तटकरे यांनीही सांगितलं की तुम्ही थोडावेळ या. मला त्यांनी विनंती केली होती की थोडावेळ तरी या. म्हणून मी आलेलो आहे. याचा अर्थ सर्व काही स्वच्छ झालं असं होत नाही”, असे स्पष्ट मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे छगन भुजबळ म्हणाले की, राज्यसभेवर जायचं की नाही, असा प्रस्ताव नाही. येवला सोडून मी जाऊ शकत नाही. समता परिषदेचे काम चालू राहिल. माझी तब्येत ठीक नाही. त्यामुळे मी भाषण करणार नाही, असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. पुढे त्यांना शिबिरासाठी अजित पवार यांनी फोन केला का? असा सवाल करण्यात आला. ते म्हणाले की, जाऊ द्या, एकदा नाही म्हणून सांगितलं ना”, असे छगन भुजबळ म्हणाले. यामुळे अजित पवारांनी छगन भुजबळ यांना कोणताही संपर्क केलेला नाही हे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Disgruntled leader chhagan bhujbal attends ncp ajit pawar group party meeting in shirdi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2025 | 01:38 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Chhagan Bhujbal
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

‘अर्थखातं लवकरच राष्ट्रवादीकडे येणार’; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आश्वासन, जय पवारांचा मोठा दावा
1

‘अर्थखातं लवकरच राष्ट्रवादीकडे येणार’; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आश्वासन, जय पवारांचा मोठा दावा

Pravin Tarde : ‘पहिली भेट दादांच्या चरणी’; ‘देऊळबंद 2’ सिनेमाचे 100 कोटी पार! अजित पवारांच्या स्मृतिस्थळी केले वंदन
2

Pravin Tarde : ‘पहिली भेट दादांच्या चरणी’; ‘देऊळबंद 2’ सिनेमाचे 100 कोटी पार! अजित पवारांच्या स्मृतिस्थळी केले वंदन

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत
3

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.