
Eknath Shinde
यावेळी एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणाची सुरुवात चक्क गुजराती भाषेत केली. “वडनगरनी धरतीना सपूत, देश अने दुनियाना लाडला बनी गया छे…” असं म्हणत त्यांनी वडनगरच्या भूमीवर येऊन अभिमान वाटत असल्याचं सांगितलं. महाराष्ट्राच्या वतीने, साडेबारा कोटी जनतेच्या आणि शिवसेनेच्या वतीने त्यांनी नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
मोदींच्या वयाबद्दल बोलण्यापेक्षा त्यांच्या कर्तृत्वाची उंची मोजली पाहिजे, असं शिंदे यांनी आपल्या भाषणात म्हटलं. “मोदीजींच्या कर्तृत्वाची गणना हिमालयाच्या उंचीने होते आणि जनतेप्रति त्यांचं कार्य अरबी समुद्राच्या खोलीने मोजलं जाऊ शकतं,” असं त्यांनी नमूद केलं.
‘शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण देताना काय निकष होते?’ सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल
वडनगरच्या मातीतून सुरू झालेला मोदींचा प्रवास देशाच्या आणि परदेशातील व्यासपीठांपर्यंत पोहोचल्याचं सांगत शिंदेंनी ‘वडनगर ते वाराणसी’ सेवा यात्रेचा उल्लेख केला. त्यांच्या मते ही यात्रा सेवा, संकल्प आणि विकासाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासाचं प्रतीक आहे.
अमित शाह यांनी NDA बैठकीत मोदींच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनाचा उल्लेख केल्याचंही शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा प्रवास करताना पदं आणि जबाबदाऱ्या बदलत गेल्या, मात्र सेवेचा संकल्प कायम राहिला, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, वडनगरहून वाराणसीपर्यंत ‘सेवा संकल्प’ बाइक यात्रेलाही सुरुवात करण्यात आली आहे. ही यात्रा मोदींच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनाशी जोडण्यात आली आहे.
📍वडनगर, #गुजरात | देशाचे लोकप्रिय, यशस्वी आणि कर्तबगार प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिनानिमित्त आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवेला अभिवादन करण्यासाठी वडनगर, गुजरात येथून राष्ट्रव्यापी ‘सेवा संकल्प अभियानाचा’ शुभारंभ करण्यात आला. वडनगरच्या… pic.twitter.com/QIKohtPpnA — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 17, 2026
शिंदेंनी आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आणि देशाच्या बदलत्या अर्थव्यवस्थेचा उल्लेख केला. गॅस कनेक्शन, घर, बँक खाते आणि नळाचं पाणी यांसारख्या योजनांचा संदर्भ देत त्यांनी जनसेवेचा मुद्दा मांडला.
Aaditya Thackeray : ‘मी दिशा सालियनला… सत्य बदलू शकत नाही…’ आदित्य ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं
तसंच ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ यांचा उल्लेख करत देशाच्या प्रगतीवर भाष्य केलं. कलम 370, राष्ट्रीय सुरक्षा आणि विकसित भारताच्या संकल्पाचाही त्यांनी उल्लेख केला.
वडनगरमधील या कार्यक्रमातून मोदींच्या वाढदिवसासोबतच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षांचा प्रवास अधोरेखित करण्यात आला. ‘सेवा संकल्प अभियान’ देशभरात विविध जनसेवा उपक्रमांच्या माध्यमातून राबवलं जात आहे.