Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. मोदींसोबत महाराष्ट्रातील दुष्काळावर चर्चा झाल्याचं शिंदेंनी सांगितलं. तसेच पुणे शिक्षक मतदारसंघातून मंगेश चिवटे निवडणूक लढणार असून त्यांना एबी फॉर्म देण्यात आल्याची मोठी घोषणा शिंदेंनी केली.

  • By विवेक
Updated On: Oct 05, 2026 | 09:25 PM
Eknath Shinde Mangesh Chivate

Eknath Shinde Mangesh Chivate

Follow Us
Follow Us:
  • मोदी-शिंदेंमध्ये सुमारे तासभर चर्चा; महाराष्ट्रातील दुष्काळावर चर्चा.
  • केंद्र सरकार महाराष्ट्राला शक्य ती मदत करेल, असं आश्वासन मोदींनी दिल्याचं शिंदेंनी सांगितलं.
  • पुणे शिक्षक मतदारसंघातून मंगेश चिवटे लढणार; एबी फॉर्म घेतल्याची शिंदेंची माहिती.
 

Eknath Shinde : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी बैठकीतील चर्चेबाबत माहिती दिली.

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीबाबत मोदींशी चर्चा केल्याचं शिंदे यांनी सांगितलं. राज्यातील पाणी, चारा आणि नुकसान झालेल्या भागांची परिस्थिती याबाबत पंतप्रधानांनी माहिती घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही

“शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे,” असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. महाराष्ट्रातील दुष्काळाच्या परिस्थितीबाबत आपण पंतप्रधान मोदींशी चर्चा केली असून, महाराष्ट्राला शक्य ती मदत करण्याचं आश्वासन मोदींनी दिल्याचं शिंदे यांनी सांगितलं.

Modi Cabinet : मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत, दोन केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, श्रीकांत शिंदेंना केंद्रात लॉटरी लागणार?

पाणी आणि चाऱ्याची उपलब्धता, कुठे आणि किती नुकसान झालं आहे, यासह विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. अनेक मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले असून त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिल्याचंही शिंदे म्हणाले.

पुणे शिक्षक मतदारसंघातून मंगेश चिवटे लढणार

दरम्यान, मोदी-शिंदे भेटीनंतर विधान परिषद निवडणुकीबाबत एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातून मंगेश चिवटे निवडणूक लढणार असल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलं आहे.

मंगेश चिवटे यांनी एबी फॉर्म घेतला असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा महत्त्वाची मानली जात आहे. उपलब्ध वृत्तांनुसार भाजपने या मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली आहे, तर शिवसेनेचे मंगेश चिवटे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.

महायुतीत चर्चा होणार

विधान परिषद निवडणुकीच्या फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू असून माघार घेण्यासाठी अजून वेळ आहे. त्यामुळे या काळात महायुतीमध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

मात्र, पुण्याच्या जागेवरून मंगेश चिवटे लढणार असून त्यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे, अशी भूमिका शिंदे यांनी स्पष्ट केली आहे.

मोदींचं एकनाथ शिंदेंकडून कौतुक

यावेळी एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचंही कौतुक केलं. मोदी एकही दिवस सुट्टी न घेता देशासाठी काम करत असल्याचं ते म्हणाले. देशाचं हित प्रथम हा त्यांचा अजेंडा असल्याचंही शिंदे यांनी नमूद केलं.

तसंच, विरोधकांकडून मोदींवर होणाऱ्या टीकेवरही शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. “आरोप करणं सोपं आहे,” असं म्हणत त्यांनी ठाकरे गटावर टीका केली आणि पंतप्रधानांबद्दल सन्मान असला पाहिजे, असं म्हटलं.

दरम्यान, दुष्काळी परिस्थिती आणि विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मोदी-शिंदे भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही दिवसांत कोणत्या घडामोडी होतात, याकडे लक्ष लागलं आहे.

Nagpur Graduate Election: महायुतीत विधानपरिषद उमेदवारीवरून अंतर्गत वादाची ठिणगी;देवेंद्र फडणवीसांचा इशारा

Web Title: Eknath shinde pm modi meeting mangesh chivate abh form pune teacher constituency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 09:25 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • MLC Election
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?
1

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?

Modi Cabinet : मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत, दोन केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, श्रीकांत शिंदेंना केंद्रात लॉटरी लागणार?
2

Modi Cabinet : मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत, दोन केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, श्रीकांत शिंदेंना केंद्रात लॉटरी लागणार?

बाणगंगा तलावातील जलजीवन धोक्यात? मृत माशांचा खच, Mangal Prabhat Lodha यांनी केली पाहणी
3

बाणगंगा तलावातील जलजीवन धोक्यात? मृत माशांचा खच, Mangal Prabhat Lodha यांनी केली पाहणी

मोदींच्या २५ वर्षांच्या प्रवासाची रंगमंचावर गाथा; ‘हनुमान अंश’प्रमाणे ‘नमो सेवा गाथा’ही रेकॉर्ड करेल; रविंद्र चव्हाणांचा मोठा दावा
4

मोदींच्या २५ वर्षांच्या प्रवासाची रंगमंचावर गाथा; ‘हनुमान अंश’प्रमाणे ‘नमो सेवा गाथा’ही रेकॉर्ड करेल; रविंद्र चव्हाणांचा मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.