Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : भरत गोगावलेंनी मंत्रिपदाची ऑफर दिली अन् दुसऱ्याच दिवशी शिंदें थेट आमदाराच्या घरी! पंढरपुरात नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics : मंत्री भरत गोगावले यांनी शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांना शिवसेनेत येण्याची आणि मंत्रिपदाची ऑफर दिली. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट पंढरपुरात त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे सोलापूरसह राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.

  • By विवेक
Updated On: Nov 21, 2026 | 05:32 PM
Eknath Shinde

Eknath Shinde

Follow Us
Follow Us:
  • मंत्रिपदाची ऑफर अन् शिंदेंची थेट अभिजीत पाटलांच्या घरी भेट
  • ‘शिवसेनेत या, मंत्रिपद देतो’; गोगावलेंची जाहीर ऑफर
  • अभिजीत पाटील यांनी काय दिलं स्पष्टीकरण?
 

पंढरपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भेटीगाठी आणि राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्या राजकीय भूमिकेबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी थेट मंत्रिपदाची ऑफर दिल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अभिजीत पाटील यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात चर्चांना चांगलाच रंग चढला आहे. (Maharashtra Politics)

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यात त्यांनी अचानक आमदार अभिजीत पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, ही भेट भरत गोगावले यांनी मंत्रिपदाची ऑफर दिल्यानंतर लगेचच झाल्याने राजकीय चर्चांना अधिक उधाण आलं आहे.

भरत गोगावले नेमकं काय म्हणाले होते?

मंत्री भरत गोगावले यांनी पंढरपुरातील एका कार्यक्रमात अभिजीत पाटील यांना शिंदे यांच्या शिवसेनेत येण्याची जाहीर ऑफर दिली होती. ‘तुमचं आमच्या पक्षात येणं झालं, तर तुम्हाला थेट मंत्रिपद देऊ शकतो,’ असं गोगावले म्हणाले होते. एवढंच नाही, तर आपलं अडीच वर्षांचं मंत्रिपदही त्यांच्यासाठी सोडण्याची तयारी असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं होतं.
या वक्तव्यानंतर अभिजीत पाटील शिंदे गटात जाणार का, अशी चर्चा सुरू झाली.

Prakash Ambedkar : राज्य सरकारकडे पुढच्या तीन महिन्यांएवढाही धान्यसाठा नाही? प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा, म्हणाले…

अभिजीत पाटील यांची भूमिका काय?

दरम्यान, अभिजीत पाटील यांनी शिंदे यांच्यासोबतच्या भेटीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उपमुख्यमंत्री आपल्या मतदारसंघात आले असताना विकासकामांचे प्रश्न मांडणं आणि त्यांची भेट घेणं हे लोकप्रतिनिधी म्हणून आपलं कर्तव्य असल्याचं त्यांनी सांगितलं. गोगावले यांनी दिलेली मंत्रिपदाची ऑफर हा त्यांच्या मनाचा मोठेपणा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. मात्र, पक्षांतराबाबत कोणतीही अधिकृत घोषणा त्यांनी केलेली नाही.

पाच मृतांच्या कुटुंबीयांना 7 लाखांची मदत

दुसरीकडे, पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात विहिरीच्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या चार कामगारांच्या कुटुंबीयांना आणि विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या एका शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना मदत देण्यात आली. शासनाकडून प्रत्येकी 5 लाख आणि शिवसेनेकडून 2 लाख रुपये, अशी एकूण 7 लाखांची मदत देण्यात आली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली.

एकीकडे मंत्रिपदाची ऑफर, दुसरीकडे शिंदेंची घरभेट आणि त्यात अभिजीत पाटील यांची भूमिका. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे आता सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

Nitesh Rane Press Confernce : टिपू सुलतान जयंतीवरून नितेश राणे आक्रमक; म्हणाले, हे खपवून घेतले जाणार नाही…’

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: भरत गोगावले यांनी अभिजीत पाटील यांना काय ऑफर दिली?

    Ans: अभिजीत पाटील यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांना मंत्रिपद देऊ शकतो, अशी जाहीर ऑफर मंत्री भरत गोगावले यांनी दिली होती. त्यांनी स्वतःचे अडीच वर्षांचे मंत्रिपद सोडण्याची तयारीही दर्शवली होती.

  • Que: एकनाथ शिंदे यांनी अभिजीत पाटील यांची भेट कुठे घेतली?

    Ans: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्तिकी एकादशीच्या पंढरपूर दौऱ्यादरम्यान आमदार अभिजीत पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.

  • Que: अभिजीत पाटील शिंदे गटात प्रवेश करणार आहेत का?

    Ans: सध्या अभिजीत पाटील यांच्या पक्षांतराबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. शिंदे यांची भेट ही मतदारसंघातील विकासकामांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि लोकप्रतिनिधी म्हणून घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Maharashtra politics eknath shinde abhijit patil meeting bharat gogawale minister offer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 05:31 PM

Topics:  

  • Bharat Gogawale
  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Mumbai Politics: मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरकारचा ७० हजार कोटींचा ‘पाताळ लोक’ मेगा प्लॅन
1

Mumbai Politics: मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरकारचा ७० हजार कोटींचा ‘पाताळ लोक’ मेगा प्लॅन

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने एकनाथ शिंदेंची सपत्नीक शासकीय महापूजा; शिंदेंकडून तब्बल ‘इतक्या’ तोळ्यांचा हार विठूरायाला अर्पण
2

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने एकनाथ शिंदेंची सपत्नीक शासकीय महापूजा; शिंदेंकडून तब्बल ‘इतक्या’ तोळ्यांचा हार विठूरायाला अर्पण

Sanjay Raut Alleges Rs 150 Crore Offer: डिलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव १५० कोटी? संजय राऊतांचा खळबळजनक दावा
3

Sanjay Raut Alleges Rs 150 Crore Offer: डिलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव १५० कोटी? संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: उत्तर महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट
4

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: उत्तर महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.