Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भेट घेतली तरी हेतू एकच’… धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीबाबत मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis: राज्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्या भेटीवरुन राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. यावर आज मुख्यमंत्र्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: Feb 16, 2025 | 06:46 PM
'भेट घेतली तरी हेतू एकच'... धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीबाबत मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

'भेट घेतली तरी हेतू एकच'... धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीबाबत मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

Follow Us
Close
Follow Us:

Devendra Fadnavis Marathi News: बीड मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर भाजपचे आमदार सुरेश धस हे गेल्या काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत आहेत. त्यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेत आरोपींच्या अटकेची मागणी केली. त्यानंतर, आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत आपण या प्रकरणातून हटणार नाही, असे म्हणत आमदार धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंवरही आरोप केले होते. त्यातच सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची गुप्त भेट घेतल्याची माहिती समोर आली. त्यानंतर सुरेश धस यांच्यावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केलाय.

विशेष म्हणजे, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही धस यांच्यावर हल्लाबोल करत धस यांनी दगाफटका केल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे, आमदार धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर विरोधक आक्रमक झाले आहेत, तर सत्ताधारी आपली बाजू मांडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या भेटीवर प्रतिक्रिया दिली. त्यानंतर, या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावातून प्रतिक्रिया देत विरोधकांना टोलवले. या भेटीने कुठलाही फरक पडत नाही, असे ते म्हणाले.

‘फक्त दोन तास ईडी आमच्या हातात द्या, अमित शाह सुद्धा’… ; संजय राऊत यांचा घणाघात

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

कोण कुणाला भेटलं याच्यावर राजकारण होत असेल तर ते लोकशाहीमध्ये योग्य नाही, लोकशाहीमध्ये संवाद हा सुरू राहिला पाहिजे. बीडमधील हत्याप्रकरणात मी खंबीर भूमिका घेतलेली आहे.  खंबीर भूमिका घेत असताना त्या माध्यमातून संवाद तोडून टाकायचा असं करण्याची आवश्यकता नाही. धनंजय मुंडे हे देखील राज्याचे मंत्री आहेत, एखादा आमदार एखाद्या मंत्र्याला भेटल्याने कुठलाही फरक पडत नाही. सुरेश धस यांनी देखील सांगितला आहे की, भेट घेतली तरी हेतू एकच आहे की सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. तोच हेतू घेऊन सुरेश धस काम करत आहेत. मात्र, काही लोकांच्या पोटात दुखते, त्यामुळे ते यावर टीका करतात, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीवर दिली आहे.

शाळा इंग्रजी असो की हिंदी, मराठी शिकवाविच लागणार

मुंबईत मराठी शाळांची टक्केवारी घसरली त्याबद्दल देखील देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, कुठल्याही मराठी शाळा बंद होणार नाही, याबाबत सातत्याने आम्ही निर्देश दिलेले आहेत. शाळा इंग्रजी असो की हिंदी असो त्यांना मराठी शिकवावे लागणार आहे. त्याची सक्ती आपण केलेली आहे. या सक्तीचे ते योग्य प्रकारे पालन करत आहेत की नाहीत याकडे आमचे लक्ष आहे. त्यामुळे कुठल्याही शाळेला मराठी हे शिकवावे लागेल, अशा पद्धतीचा आपण निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

Maharashtra Politics : नव्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली महायुतीची पोलखोल? म्हणाले, “आता मांडवली…”

Web Title: Even if they meet the purpose is the same chief ministers first reaction to dhananjay munde suresh dhas meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2025 | 06:46 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • dhananjay munde
  • Suresh Dhas

संबंधित बातम्या

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय
1

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय

Devendra Fadnavis News: दिल्लीची वाट न पाहता दिवाळीपूर्वी मदत देणार; देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन
2

Devendra Fadnavis News: दिल्लीची वाट न पाहता दिवाळीपूर्वी मदत देणार; देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन

Cabinet Meeting: फडणवीस सरकारचा धडाका! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 5 महत्त्वाचे मोठे निर्णय
3

Cabinet Meeting: फडणवीस सरकारचा धडाका! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 5 महत्त्वाचे मोठे निर्णय

Devendra Fadnavis :  ‘ब्रश ऑफ होप’चा मोबाईल App गेमचेंजर ठरणारा, या अ‍ॅपसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं?
4

Devendra Fadnavis : ‘ब्रश ऑफ होप’चा मोबाईल App गेमचेंजर ठरणारा, या अ‍ॅपसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.