
'शेवटच्या क्षणी..' अजित पवारांचे विमान उडवणाऱ्या पायलटच्या ट्रेनर काय म्हणाला?
Supreme Court News: UGC च्या नव्या नियमांना स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
सुरक्षित लँडिंगसाठी नियमांनुसार किमान ५,००० मीटर दृश्यमानता आवश्यक आहे. तथापि, सुरुवातीच्या अहवालांवरून असे दिसून येते की अपघाताच्या वेळी दृश्यमानता सुमारे ३,००० मीटर होती. असे असूनही, लँडिंगचा प्रयत्न करण्यात आला, जो तपासात महत्त्वाचा मुद्दा बनू शकतो.
सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणातून काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. यानुसार लँडिंगच्या शेवटच्या काही सेकंदात विमानात काहीतरी चूक झाली असावी. विमानाच्या धावपट्टीची दृश्यमानता ओळखण्याचा प्रयत्न करत असतान विमान चुकीच्या ठिकाणी उतरत असल्याचे पायलटला शेवटच्या क्षणी लक्षात आले असावे. त्याचवेळी काही सेकंदांसाठी वैमानिकाचे विमानाच्या वेग आणि उंचीवर त्याचे लक्ष गेले नसावे.
बारामती विमान अपघाताच्या तांत्रिक तपासादरम्यान आता वैमानिकांची मानसिक स्थिती आणि त्यावेळच्या परिस्थितीवर तज्ज्ञांनी प्रकाश टाकला आहे:
तज्ज्ञांच्या मते, दोन्ही वैमानिक अत्यंत अनुभवी आणि अशा प्रकारच्या विमानांवर उड्डाण करण्यासाठी पूर्णपणे सक्षम होते. त्यांच्या प्रशिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडून कोणत्याही मूलभूत तांत्रिक चुका किंवा निष्काळजीपणा होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यामुळे हा अपघात केवळ मानवी त्रुटी नसून, बदललेली परिस्थिती आणि बाह्य दबावाचा एकत्रित परिणाम असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Baramati Accident : फ्लाइट अटेंडंट पिंकी माळीचे पार्थिव निवासस्थानी दाखल! अडीच वर्षांचा संसार मोडला
तपासादरम्यान तज्ज्ञांनी ‘व्हीआयपी दबावा’ची शक्यता व्यक्त केली आहे. अनेकदा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना (VIPs) वेळेवर पोहोचवण्यासाठी किंवा लँडिंग रद्द केल्यास आपल्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, या मानसिक दडपणाखाली वैमानिक जोखमीचे निर्णय घेतात. पहिल्या प्रयत्नात लँडिंग अयशस्वी झाल्यानंतर, दुसऱ्यांदा प्रयत्न करताना हा ‘मानसिक दबाव’ निर्णायक ठरला असावा का?
या सर्व बाबींची सध्या सखोल चौकशी सुरू आहे. या दबावामुळे वैमानिकांकडून ‘सिच्युएशनल अवेयरनेस’ (Situational Awareness) गमावला गेला असावा का, याचा शोध सीआयडी आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय घेत आहेत.