Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रशासनावर मजबूत पकड अन्…; अजित पवारांच्या निधनानंतर निलम गोऱ्हेंची प्रतिक्रीया

अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 29, 2026 | 03:15 PM
प्रशासनावर मजबूत पकड अन्...; अजित पवारांच्या निधनानंतर निलम गोऱ्हेंची प्रतिक्रीया

प्रशासनावर मजबूत पकड अन्...; अजित पवारांच्या निधनानंतर निलम गोऱ्हेंची प्रतिक्रीया

Follow Us
Close
Follow Us:
  • अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रावर शोककळा
  • राज्याने एक दूरदृष्टी असलेला नेतृत्वगुणी नेता गमावला
  • अजित पवारांच्या निधनानंतर निलम गोऱ्हेंची प्रतिक्रीया
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामती येथे विमान कोसळून झालेल्या अपघातामध्ये निधन झाले. अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ व लोकप्रिय नेते अजित पवार यांच्या धक्कादायक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. हा विश्वास बसणार नाही असा क्षण असून, राज्याने एक दूरदृष्टी असलेला नेतृत्वगुणी नेता गमावला आहे, असे गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

 

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, सलग सात वेळा विधानसभेवर निवडून आलेले अजित पवार हे प्रशासनावर मजबूत पकड, वेळेचे काटेकोर नियोजन आणि निर्णयक्षमतेसाठी ओळखले जात होते. कोरोना काळात त्यांनी सातत्याने आढावा बैठका घेऊन जनतेला दिलासा देणारे निर्णय घेतले. तसेच शाश्वत विकास उद्दिष्टांसाठीचा निधी संपूर्ण महाराष्ट्रासाठी राखीव ठेवण्याचा दूरगामी निर्णय त्यांच्या नेतृत्वाची दृष्टी दर्शवतो.

विधानपरिषद उपसभापतीपदाच्या काळात विविध समित्या व सभागृहाच्या कामकाजात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले. त्यांच्या निधनामुळे सहकार, शेती व विकास क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना व्यक्त करत, डॉ. गोऱ्हे यांनी शिवसेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. अजित पवार हे उत्तम संसदपटू होते आणि विधानपरिषदेत त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांना व सर्वांना हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.

हे सुद्धा वाचा : छोट्या कार्यकर्त्यालाही मोठेपणाने वागवणारे नेतृत्व हरपले; शरद बुट्टे पाटील यांची अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली

पश्चिम महाराष्ट्रातील सहकार चळवळीला धक्का

पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार चळवळीला दिशा देणारे, प्रत्येक घटकाचा बारकाईने अभ्यास करून निर्णय घेणारे नेतृत्व म्हणून अजित पवार यांची ओळख होती. सहकार क्षेत्रातील नाते, भूषण वर्ष असो वा इतर कोणताही काळ-सहकारातील प्रत्येक विषयाची त्यांना सखोल जाण होती. साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, यंत्रमाग संस्था, कापड उद्योग अशा विविध क्षेत्रांशी त्यांनी जवळीक साधली होती. केवळ वरवरचा आढावा न घेता, प्रत्येक संस्थेतील अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याची त्यांची कार्यपद्धती होती. पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात पवार काका-पुतण्याचे (शरद पवार व अजित पवार) योगदान कोणालाही विसरता येणार नाही. शरद पवार यांनी सहकार चळवळीला व्यापक दृष्टी आणि राष्ट्रीय ओळख दिली, तर अजित पवार यांनी त्या चळवळीला गतिमान प्रशासन, आर्थिक बळ आणि ठोस निर्णयक्षमतेची जोड दिली. या दोघांच्या नेतृत्वामुळे पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने, सहकारी बँका, सूतगिरण्या आणि इतर संस्था केवळ टिकून राहिल्या नाहीत, तर अनेक ठिकाणी त्यांनी प्रगतीची वाटही पकडली.

Web Title: Shiv sena leader neelam gorhe has reacted after the death of deputy chief minister ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • ajit pawar plane crash
  • dr. Neelam Gorhe

संबंधित बातम्या

Pune ZP : पुणे जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापतींची निवड; कुणाकुणाला मिळाली संधी?
1

Pune ZP : पुणे जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापतींची निवड; कुणाकुणाला मिळाली संधी?

“राष्ट्रवादीच्या दैवताना डावलून स्वतःच देव बनण्याचा…”, नाव न घेता अमोल मिटकरींचा कोणाला इशारा?
2

“राष्ट्रवादीच्या दैवताना डावलून स्वतःच देव बनण्याचा…”, नाव न घेता अमोल मिटकरींचा कोणाला इशारा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.