Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधानसभा निवडणुकीत चेहरा महत्त्वाचा; स्वच्छ, निष्कलंक उमेदवारांची गरज

खटाव, कोरेगाव, सातारा आणि कराड या चार तालुक्यातील मतदार समाविष्ट असल्याने लगतच्या तालुक्यातील जनसंपर्क महत्वाचा ठरणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 20, 2024 | 10:50 AM
चेहरा महत्वाचा

चेहरा महत्वाचा

Follow Us
Close
Follow Us:

उंब्रज : विधानसभेची निवडणूक अभूतपूर्व गोंधळात पार पडत असली तरी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात चेहरा महत्वाचा ठरणार आहे. स्वच्छ, निष्कलंक आणि जनमानसात मिसळणारे व्यक्तिमत्त्व मतदारांना आकर्षित करत असून, सभोवताली असणारे कार्यकर्ते आणि नेतेमंडळी यांनी केलेली मदत तसेच अडीअडचणीत कोण धावून येणार याकडे मतदार लक्ष देऊ लागले आहेत.

हेदेखील वाचा : हे एक कव्हर फायरिंग…; विनोद तावडे यांच्यावरील आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

कराड उत्तरची लढत अतिशय निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. जोर कुणाचा याबाबत वेगवेगळे मतप्रवाह येत असले तरी युवा मतदारांवर छाप सोडणारी उमेदवारी कुणाला तारणार? याबाबत राजकीय जाणकारांच्यात चर्चा झडू लागल्या आहेत. मतदारसंघातील सुमारे सतरा हजार मतदार आणि तरुणाई ऐनवेळी कुणाचा घात करणार ही बाब दुर्लक्षित करून चालणार नाही.

दबावाला बळी न पडता त्यांनी भविष्यातील राजकीय वाट चोखाळताना कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही ही भीमगर्जना मूळच्या कराड उत्तरेत एक नेतृत्व उमलायला लागल्याची चर्चा असून, एकास एक लढतीत दहा हजारापेक्षा जास्त मतदान घेतल्यास निर्णायक ठरण्याची चिन्हे अटीतटीच्या लढतीत दिसू लागली आहेत. यामुळे कराड उत्तरेत अंतिम सत्य काय ? याबाबत खसखस पिकली आहे.

वाढत जाणारी समर्थकांची गर्दी, पक्षातील गट,सोशल मीडिया आणि मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी या जमेच्या बाजू असल्यातरी विद्यमान आमदारांची गेल्या पंचवीस वर्षात जतन केलेली व्होट बँक दबक्या पावलाने कार्यरत आहे. तसेच कोणताही पत्ता अजून उघड केला नसल्याने परिस्थिती जरी २००४ सारखी निर्माण झाली तरी ऐनवेळी केल्या जाणाऱ्या राजकीय खेळ्या अजून बाकी असल्याने हवा कोणाची यापेक्षा कोणता गट शेवटपर्यंत एकनिष्ठ राहणार याबाबत उलटसुलट चर्चा आहेत.

खटाव, कोरेगाव, सातारा आणि कराड या चार तालुक्यातील मतदार समाविष्ट असल्याने लगतच्या तालुक्यातील जनसंपर्क महत्वाचा ठरणार असून उमेदवाराला एकाच वेळी सर्वत्र डोळ्यात तेल घालून कार्यरत राहावे लागणार आहे. सोबतीला असणारे निष्ठावंत आणि कार्यकर्त्यांची मजबूत फळी याबाबतीत बारकाईने अभ्यास करण्यात आला आहे. सूक्ष्म बाबींचा विचार करीत असताना एकनिष्ठ कार्यकर्त्यांची फळी तळागाळातील जनतेत संपर्काचे महत्त्वाचे स्तोत्र ठरणार आहे.

हेदेखील वाचा : Maharashtra Assembly Election Voting Live 2024 : पुण्यातील कोथरूड मतदार संघातील EVM मशीन बंद

Web Title: Face is important in assembly elections nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2024 | 10:44 AM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • political news

संबंधित बातम्या

सत्ता गेली तरीही तासगाव नगरपालिकेत लागला आर. आर. आबांचा फोटो
1

सत्ता गेली तरीही तासगाव नगरपालिकेत लागला आर. आर. आबांचा फोटो

Satara Politics : अमोल मोहिते यांनी स्वीकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीची अखेर
2

Satara Politics : अमोल मोहिते यांनी स्वीकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीची अखेर

नवीन वर्षाच्या स्वागताची सर्वत्र धामधूम; नवी पिढी नव्या जल्लोषात तयार
3

नवीन वर्षाच्या स्वागताची सर्वत्र धामधूम; नवी पिढी नव्या जल्लोषात तयार

Hingoli Politics : ३० वर्षांनंतर हिंगोली न.प. वर शिवसेनेचा झेंडा; रेखा श्रीराम बांगर यांनी स्वीकारला नगराध्यक्षपदाचा पदभार
4

Hingoli Politics : ३० वर्षांनंतर हिंगोली न.प. वर शिवसेनेचा झेंडा; रेखा श्रीराम बांगर यांनी स्वीकारला नगराध्यक्षपदाचा पदभार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.