
मोठी बातमी ! उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठा धक्का; 'या' बड्या नेत्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश
काँग्रेसचे उत्तर प्रदेश प्रभारी राजेंद्र पाल गौतम, पक्षाचे ओबीसी विभागाचे अध्यक्ष अनिल जयहिंद आणि खासदार राकेश राठोड यांच्या उपस्थितीत हिरा ठाकूर यांनी पक्षात प्रवेश केला. ठाकूर यांचे पक्षात स्वागत करताना, काँग्रेसचे ओबीसी विभागाचे अध्यक्ष अनिल जयहिंद म्हणाले की, जात जनगणनेत ओबीसी समाजाचा ‘विश्वासघात’ झाल्याने दुखावल्यामुळे त्यांनी भाजपला सोडले आहे. काँग्रेसमध्ये सामील झाल्यानंतर, जननायक करपुरी ठाकूर यांचा उल्लेख करत ठाकूर म्हणाले की, बिहारमध्ये मागासलेल्या वर्गांना आरक्षण देणारे ते देशातील पहिले नेते होते, परंतु मागासलेल्या वर्गांची मोठी लोकसंख्या अजूनही त्यांच्या हक्कांपासून वंचित आहे’.
दरम्यान, जात जनगणनेचा मुद्दा जोरदारपणे मांडल्याबद्दल त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे आभार मानले. हीरा ठाकूर म्हणाले, “राहुल गांधींनी जात जनगणनेसाठी मोठी लढाई लढली, पण जेव्हा जनगणनेचा अजेंडा आला, तेव्हा मागासलेल्या जातींचा विश्वासघात झाला.”
हीरा ठाकूर 12 वर्षे होते विधान परिषदेचे सदस्य
हीरा ठाकूर यांनी जवळपास १२ वर्षे विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम केले. ठाकूर हे राज्यमंत्र्याच्या दर्जाचे उत्तर प्रदेश राज्य मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्षही होते. ते अत्यंत मागासलेल्या वर्गांच्या हक्कांसाठी आवाज उठवतात आणि ‘राष्ट्रीय कर्पूरी ठाकूर विचार मंच’ नावाची त्यांची संघटनाही आहे.
मुंबईत ठाकरे गटाला धक्का; विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द
दुसरीकडे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मुंबई महापालिकेत मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं आहे. जात पडताळणी समितीकडून त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर हे प्रकरण चांगलंच तापलं होतं. विशाखा राऊत यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, तिथूनही त्यांना अपेक्षित दिलासा मिळाला नाही. अखेर मुंबई महापालिकेच्या सभेत त्यांचं पद रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली.