Former Congress Minister of State for Home Affairs Siddharam Mhetre joins Shiv Sena Shinde Solapur Politics
सोलापूर : राज्यामध्ये लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये हालचालींना वेग आला आहे. सोलापूरमध्ये देखील राजकारण रंगले आहे. सोलापूरच्या राजकारणामध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुकींच्या तोंडावर त्यांनी घेतलेला निर्णय पक्षाला महागात पडण्याची शक्यता आहे.
सोलापूरच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटाची कास धरली आहे. यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. त्यांनी मुंबई दौरा करुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली आहे. एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सिद्धराम म्हेत्रे यांनी पक्ष प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाच्या निर्णयाने सोलापूरातील काँगेसला मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची मोठी शक्यता आहे. सिध्दाराम म्हेत्रे यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त देखील निघाला आहे. येत्या
31 मे रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये असंख्य कार्यकर्त्याच्या साक्षीने हा भव्य पक्षप्रवेश पार पडणार आहे. या कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांची मोठी फौज सिद्धराम म्हेत्रे यांच्या पाठीशी बळ देण्यासाठी उभी राहणा आहे.
दरम्यान तालुका कॉग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष शंकर म्हेत्रे यांच्या हाती ही धन्युष बाण येणार आहे . तालुक्यात म्हेत्रे यांच्या हाती धन्यष्य बाण आल्याने राजकीय वेध कोणाचा घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेना पक्षामध्ये येत्या 31 मे रोजी जाहीर प्रवेश कार्यक्रम होणार आहे. लोकसभा संपर्क प्रमुख महेश नाना साठे व लोकसभा महिला संपर्क प्रमुख अनिता योगेश माळगे यांच्या समवेत माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून यानंतर पक्षप्रवेशांची तारीख देखील ठरवण्यात आली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाचे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पक्ष संघटना बांधणीच्या दृष्टीकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी आनंद परांजपे यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. तसेच ठाण्यातही राष्ट्रवादीचा वरचष्मा कायम राहावा यासाठी ठाणे गडाची सुभेदारी नजीब मुल्ला यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नजीब मुल्ला यांच्यावर प्रदेश सरचिटणीस तथा निरीक्षक अल्पसंख्यांक विभाग, महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वयक कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, भिवंडी महानगरपालिका या पदांची देखिल जबाबदारी सोपविण्यात आली आहे.