
Shivraj Patil Chakurkar : देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
लातूर : देशाचे माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. लातूरमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास वयाच्या 90 व्या त्यांचे निधन झाले. वृद्धापकाळाने शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
शिवराज पाटील चाकूरकर यांचे नाव फक्त महाराष्ट्रातीलच नाहीतर देशाच्या राजकारणातही घेतले जात होते. त्यांनी लोकसभा अध्यक्षपदासह विविध केंद्रीय मंत्रिपदे भूषविले होती. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत देशासाठी अनेक प्रतिष्ठित पदे भूषवली आहे. देशातील संवैधानिक प्रक्रियेत त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती. यापूर्वी त्यांनी १९८० च्या दशकात इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून काम पाहिले आहे. तर १९९१ ते १९९६ दरम्यान ते लोकसभेचे १० वे अध्यक्ष होते.
शिवराज पाटील चाकूरकर यांनी गृहमंत्रिपदासह अनेक पदे भूषविले होती. २०१० ते २०१५ या काळात ते पंजाब राज्याचे राज्यपाल आणि चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक होते. लातूर लोकसभा मतदारसंघातून सात वेळा विजय मिळवला होता.
‘देवघर’मध्ये अखेरचा श्वास
शुक्रवारी पहाटेच्या सुमारास लातूरमधील ‘देवघर’ या निवासस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घकालीन आजारपणामुळे त्यांच्यावर घरातच उपचार सुरु होते. मात्र, अखेर त्यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले.
चाकूर गावात झाला होता जन्म
१२ ऑक्टोबर १९३५ रोजी लातूर जिल्ह्यातील चाकूर गावात शिवराज पाटील यांचा जन्म झाला. ते लातूरसह मराठवाड्यातील काँग्रेसचे प्रभावी नेते होते. त्यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून सात वेळा विजय मिळवला होता. २००४ मध्ये लोकसभेतून पराभूत झाल्यानंतरही राज्यसभेतून गृहमंत्रिपद आणि केंद्रीय जबाबदाऱ्या स्वीकारल्या होत्या.
हेदेखील वाचा : Sharad Pawar Dinner Night : पवार कुटुंबामध्ये झाले मनोमीलन? वाढदिवसाच्या Pre-Dinner मध्ये काका पुतण्या दिसले एकत्र