Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मस्ती असेल तर पाकिस्तानात जा..”, पालकमंत्री Sanjay Shirsat यांनी Imtiaz Jaleel यांना सुनावले खडेबोल

Political News: मुंब्र्यातील 'हिरवा करू' विधानावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकारण तापले आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांना 'सापाची पिलावळ' म्हणत पाकिस्तानात जाण्याचा इशारा दिला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 26, 2026 | 03:24 PM
“मस्ती असेल तर पाकिस्तानात जा..”, पालकमंत्री Sanjay Shirsat यांनी Imtiaz Jaleel यांना सुनावले खडेबोल
Follow Us
Close
Follow Us:

 

  • “इम्तियाज जलील म्हणजे सापाची पिलावळ”
  • संजय शिरसाट यांचा घणाघात
  • तर ‘महाराष्ट्र तुझ्या बापाचा नाही’ म्हणत आमदारांनी सुनावलं!
Sanjay Shirsat on Imtiaz Jaleel: इम्तियाज जलील हा साप आहे, हे निजामाचे पूर्वज आहेत, महाराष्ट्रात येऊन अशांतता कशी पसरेल हे त्यांचे लक्ष्य आहे. परंतु हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, संत महंतांचा, समाजवादी चवळीचा आणि पुरोगामी लोकांचा हा महाराष्ट्र आहे. अशा महाराष्ट्राला एखाद्या रंगाने रंगवून जो जातीचा रंग देण्याचा प्रयत्न करतोय हा अत्यंत घातक असून यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केली. दरम्यान, यासंदर्भात इम्तियाज यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

महापालिका निवडणुकीत यंदा एमआयएमला राज्यभरात चांगले यश मिळाले. मुंब्रा मुंबई येथील पक्षाच्या नगरसेविका सहर शेख यांनी, कैसा हराया म्हणत पूर्ण मुंब्रा हिरवा करू, असे वक्तव्य केले होते. दरम्यान, या वक्तव्याचे आता राज्यभरात पडसाद उमटू लागले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या वक्तव्याविरोधात पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. तर महायुतीतील शिवसेनेसह भाजपदेखील या वक्तव्यावर एमआयएमचा समाचार घेत आहे.

रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ज्यांनी हा शब्द वापरला त्यांनी माफीनामाही दिलाय, आणि हा (इम्तियाज जलील) जाऊन तिथे तेल टाकतो. ही जी काही सापाची पिलावळ आहे अशा लोकांना ठेचले पाहिजे, असा जोरदार हल्लाबोल शिरसाटांनी केला.

राजकारणात भूकंप! अखेर ठाकरे आणि शिंदे शिवसेना एकत्र, BJP कोमात

काही ठिकाणी त्यांचे नगरसेवक निवडून आलेही असतील, त्याचा आनंद आहे परंतु, ताबडतोब एक भूमिका बदलून हिंदुस्थान-पाकिस्तान करण्याची भाषा ते करायला लागले आहेत. तुम्हाला एवढी मस्ती असेल तर पाकिस्तानात जा. याठिकाणी असलेल्या मुसलमान आणि हिंदूंमध्ये द्वेष पसरवू नका, इथला माणूस शांततेत राहतोय त्याला शांततेतच राहू द्या, अन्यथा त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, असा इशारा देखील मंत्री शिरसाट यांनी जलील यांना दिला.

हा शिवरायांचा भगवा

मंत्री शिरसाट पुढे म्हणाले, हा शिवरायांचा भगवा आहे. हे संत महात्म्यांचे प्रतीक आहे. हा भगवा कोणा जातीधर्माच्या नाही. ज्या पद्धतीने तुम्ही जातीवर बोलता त्यापद्धतीने आम्ही बोलत नाही. काल जलील यांनीही त्यांच्या गळ्यात भगवा घातला होता, त्याला कोणी आक्षेप घेतला का ? आम्हाला याबद्दल द्वेष नाही. तुम्हाला भगव्याचे वावडे असेल तर तुम्ही परिधान करू नका. मात्र, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती आम्ही जपणार असल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्र तुझ्या बापाचा नाही !

दरम्यान, जलील यांच्या ‘महाराष्ट्र हिरवा करू’ या वक्तव्याचा समाचार घेताना भाजपचे आ. केणेकर जलील यांना उद्देशून म्हणाले, हा महाराष्ट्र तुझ्या बापाचा नाही. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा आहे. येथे प्रभू रामचंद्रांची संस्कृती वाहतेय. यापुढेही येथे भगवा रंगच चालणार. महापालिकेत निवडून आलेले नगरसेवक हे पावसाळ्यातील छत्र्या आहेत, आम्ही त्या कधीही काढून फेकू. त्यांना परत हैदराबादला पाठवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशी भूमिकाही आ. केणेकर यांनी बोलून दाखवली.

Gulabrao Patil controversial statement : “तुमची बायको हेमामालिनी आहे असं समजा…! गुलाबराव पाटील हे काय गेले बोलून?

Web Title: Sanjay shirsat attack imtiaz jaleel mumbra green statement controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Imtiaz Jaleel
  • MLA Sanjay Shirsat
  • political news

संबंधित बातम्या

SSC HSC Exam 2026 : कॉपीमुक्त अभियानाला विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद; परिक्षा केंद्रावर ड्रोनद्वारे नजर
1

SSC HSC Exam 2026 : कॉपीमुक्त अभियानाला विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद; परिक्षा केंद्रावर ड्रोनद्वारे नजर

Republic Day 2026 : महाराष्ट्र हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा…! CM फडणवीसांनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
2

Republic Day 2026 : महाराष्ट्र हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा…! CM फडणवीसांनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

कोल्हापूरमध्ये बंडखोरीचा भडका; जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षीय नेतृत्वासमोर आव्हान
3

कोल्हापूरमध्ये बंडखोरीचा भडका; जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षीय नेतृत्वासमोर आव्हान

इचलकरंजी महानगरपालिकेत पद 1 अन् इच्छुक 27; नेत्यांची कृपादृष्टीतील पहिला मानकरी कोण?
4

इचलकरंजी महानगरपालिकेत पद 1 अन् इच्छुक 27; नेत्यांची कृपादृष्टीतील पहिला मानकरी कोण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.