
maharashtra cm devendra fadnavis celebrate republic day 2026 in mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजारोहण केले. यानंतर त्यांनी राज्यातील आणि जगभरातील भारतीय नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने संविधानाचे महत्त्व आणि आर्थिक प्रगतीवर भर दिला. जगभरातील भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. आपला प्रजासत्ताक आणि आपली लोकशाही चिरायु होवो, अशी प्रार्थना करतो. २६ जानेवारी १९५० रोजी आपण भारताचे संविधान हे अंगीकृत केले. त्यातून एक लोकशाहीप्रधान अशा प्रकारचा प्रजासत्ताक आपण निर्मित केला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.
हे देखील वाचा : राजकारणात भूकंप! अखेर ठाकरे आणि शिंदे शिवसेना एकत्र, BJP कोमात
पुढे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “आपला महाराष्ट्र संतांची वीरांची भूमी आहे. त्या भूमीमध्ये आज आपण देशाच्या विकासाचे इंजिन म्हणून आपला महाराष्ट्र चांगलं काम करत आहे. नुकतंच दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी ३० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले. महाराष्ट्र थांबणार नाही तो पुढेच जात राहिल. या गुंतवणुकीचा सर्वात मोठा परिणाम तर तो महाराष्ट्राच्या सर्व भागात आज गुंतवणूक येत आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र तसेच मुंबईसह कोकण असो सर्व भाग हे महाराष्ट्राच्या विकास गंगेचे भाग होतात. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचे काम हे सरकारच्या माध्यमातून सुरु आहे,” असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.
LIVE | प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित शासकीय राष्ट्रध्वजवंदन व संचलन कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती 🕤 स. ९.३४ वा. | २६-१-२०२६📍मुंबई. #Maharashtra #Mumbai #RepublicDay2026 https://t.co/opxRMaCToF — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 26, 2026
हे देखील वाचा : नवनिर्वाचित नगरसेवक बेपत्ता; कल्याण डोंबिवली निवडणूक: पोस्टरबाजीची जोरदार चर्चा
पुढे मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, “महाराष्ट्रातील आमचा शेतकरी सुखावला पाहिजे. या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने भूमिका घेतली. ज्या ज्या वेळी शेतकरी अडचणीत आला त्या त्या वेळी शेतकऱ्यांना भरघोस मदत सरकारच्या वतीने झाले. त्यानंतर आता पुढच्या काळात दुष्काळमुक्त महाराष्ट्राकडे वाटचाल करत आहेत. नदी जोड प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना पाणी दिले. पायाभूत सुविधांच्या बाबतीत महाराष्ट्र विविध विक्रम करताना दिसत आहे. समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग हा देखील तयार होत आहे. आदिवासी अनुसुचित जातींकरिताही विकासाच्या विविध योजना केल्या जात आहेत. अशाप्रकारच्या विविध योजनांद्वारे समाजातील प्रत्येक घटकाचा विकास करण्याचा प्रयत्न हा शासनाच्या माध्यमातून सुरु आहे. निश्चित येत्या काळात महाराष्ट्र भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून या ठिकाणी कार्य करेल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे.