Former MP and AIMIM leader Imtiaz Jaleel acquitted by court on charges of obstruction of government work
मुंबई: माजी खासदार आणि एआयएमआयएम नेते इम्तियाज जलील यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने जलील आणि इतर आरोपींना एका प्रकरणातून निर्दोष मुक्त केले आहे. कोरोना काळात लागू केलेल्या लॉकडाऊन दरम्यान व्यापाऱ्यांच्या हक्कांसाठी लढणारे तत्कालीन खासदार इम्तियाज जलील आणि इतर सर्व आरोपींना सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपातून न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.
कोरोना काळात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता, त्यावेळी ५६ व्यावसायिक प्रतिष्ठाने सील करण्यात आली होती आणि व्यापाऱ्यांना मोठा दंड ठोठावण्यात आला होता. उप कामगार आयुक्त कार्यालयात १ जून २०२१ रोजी सुनावणी होणार होती.तत्कालीन खासदार जलील यांनी व्यापाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी उप-कामगार आयुक्त कार्यालयात स्वतः एक शिष्टमंडळ नेले. त्यांनी आस्थापनांवरील सील काढून टाकण्याची आणि दंड कमी करण्याची मागणी केली. निदर्शने शांततापूर्ण होती, परंतु जलील आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सार्वजनिक हक्कांसाठी लढा
न्यायालयीन सुनावणीनंतर, न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या निकालात स्पष्टपणे म्हटले आहे की या प्रकरणात कोणताही गुन्हा झालेला नाही. न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष घोषित केले आणि त्यांना निर्दोष मुक्त केले. त्यामुळे AIMIM नेते इम्तियाज जलील यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
न्यायालयाने हा निकाल दिल्यानंतर AIMIM नेते इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, हा खटला सार्वजनिक हक्कांसाठीच्या लढ्याचे प्रतीक आहे. आम्ही न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास ठेवला होता आणि आज तो विश्वास सार्थ ठरला आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हा गुन्हा नसून सार्वजनिक सेवेचे प्रतीक आहे हे या निकालाने सिद्ध केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शनिवारवाडा नमाज पठन वादात AIMIM पक्षाची उडी
पुण्यातील ऐतिहासिक वास्तू असलेल्या शनिवारवाड्यामध्ये नमाज पठन केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. तीन ते चार महिलांनी नमाज पठन केल्यामुळे वादंग निर्माण झाला आहे. एआयएमआयएमचे राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यांनी प्रतिक्रिया देत पुन्हा भाजपला डिवचले आहे. वारिस पठाण म्हणाले की, भाजप आपल्या देशाची धर्मनिरपेक्ष आणि बहुआयामी धोरण नष्ट करू पाहत आहे. भाजप केवळ द्वेष पसरवण्याचे काम करत आहे जर 3-4 मुस्लीम महिलांनी शुक्रवारी एकाच ठिकाणी नमाज पठण केले तर त्यामुळेच तुम्ही हैराण झालात का? असा सवाल त्यांनी केला. हिंदू लोक ट्रेन आणि विमानतळावर गरबा खेळतात. तेव्हा तर मुसलमान त्यावर कधी आक्षेप घेत नाहीत. ASI द्वारे संरक्षित या जागेत 3 मिनिटांच्या नमाज पठणाने तुम्ही हैराण झाल्याचे त्यांनी डिवचले. तुम्ही अजून किती द्वेष पसरवाल असा सवाल त्यांनी भाजप नेत्यांना केला. शनिवारवाडा नाही तुमची मनं स्वच्छ, शुद्ध करणे गरजेचे आहे, असे देखील वारिस पठान म्हणाले आहेत.