Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा लवकरच वाजणार बिगूल; अंतिम मतदार यादी 4 ऑगस्टला होणार प्रसिद्ध

एसआयआर प्रक्रिया पूर्ण करून तयार होणाऱ्या मतदारयादीला अंतिम स्वरूप आल्यानंतर या निवडणुका घेण्याची मागणी काही जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 19, 2026 | 09:53 AM
Pune Electoral Roll 2026, Pune Voter List Revision, Form Number 6

Pune Electoral Roll 2026, Pune Voter List Revision, Form Number 6

Follow Us
Follow Us:

कोल्हापूर : राज्यातील १५ हजार १५५ ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ४ ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर केव्हाही आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. २०२४ ते २०२५ मध्ये मुदत संपलेल्या व २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या राज्यातील एकत्रित ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाने जूनमध्ये प्रभागनिहाय आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली.

त्यानंतर आता प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. दरम्यान, एसआयआर प्रक्रिया पूर्ण करून तयार होणाऱ्या मतदारयादीला अंतिम स्वरूप आल्यानंतर या निवडणुका घेण्याची मागणी काही जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती; परंतु आयोगाने वेळेत निवडणुका घेण्याच्यादृष्टीने प्रभागनिहाय मतदार यादीसाठी १५ एप्रिल २०२६ रोजीच्या विधानसभा मतदारसंघाची यादी ग्राह्य धरण्याचे सूचित केले आहे.

निवडणुका ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान?

विशेषतः प्रभागनिहाय यादीला अंतिम स्वरूप आल्यानंतर आठ-पंधरा दिवसांत निवडणुकांचा बिगुल वाजतो, हा आजपर्यंतचा प्रशासनाचा अनुभव आहे; परंतु पावसाचे प्रमाण पाहून या निवडणुका ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यताही आहे.

दृष्टिक्षेपात मतदार यादी कार्यक्रम

मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक : १५ एप्रिल

प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध : २४ जुलै

हरकती व सूचना दाखलची मुदत : २९ जुलै

अंतिम मतदार यादी प्रसिद्ध : ४ ऑगस्ट

गायरान जमिनींचा प्रश्न ऐरणीवर 

दुसरीकडे, पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या ताब्यातील गायरान जमिनी या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (PMRDA) वर्ग करू नयेत आणि त्या ग्रामपंचायतींकडेच कायम ठेवाव्यात, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष विरधवल जगदाळे यांनी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे. यासाठी जगदाळे यांनी बुधवारी मुंबईत जाऊन पवार यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गटनेते शरद बुट्टे पाटील उपस्थित होते

विठूनामाचा गजर अन्…! सोमेश्वरनगर येथे संत सोपानकाका पालखीचे पहिले गोल अश्वरिंगण उत्साहात संपन्न; दीड लाख वारकऱ्यांची उपस्थिती

Web Title: Gram panchayat election final electoral roll will be published on august 4

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 09:53 AM

Topics:  

  • Election News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.