Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर इज्राइल मधल्या निवडणुका जाहीर, २७ ऑक्टोबरला नेतन्याहू यांचे भविष्य ठरणार, काय आहेत महत्वाचे मुद्दे?

प्रतिक्षीत इज्राइली निवडणूकीची तारीख जाहीर झाली . २७ ऑक्टोबर . नेतन्याहू समोरील आव्हान आणि राजकीय भविष्य ठरवणारी निवडणूक

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 13, 2026 | 09:00 PM
netanyahhu photo credit - social media

netanyahhu photo credit - social media

Follow Us
Follow Us:
  • अखेर इज्राइल मधल्या निवडणुका जाहीर
  • २७ ऑक्टोबरला नेतन्याहू यांचे भविष्य ठरणार
  • काय आहेत महत्वाचे मुद्दे?
Israel Election 2026: २७ ऑक्टोबर ही इज्राइल मधील निवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हमास चा हल्ला आणि ईराण सोबत चाललेल्या युद्धा नंतर इज्राइल मधील ही पहिलीच निवडणूक आहे. ही निवडणूक पंतप्रधान नेतन्याहू यांचे राजकीय भविष्य ठरवणारी असेल.

इज्राइल मधील निवडणूक आणि नेतन्याहू यांचे राजकीय भविष्य

इज्राइल मधील राजकीय चर्चेला उधाण आले आहे. कारण देशात निवडणुकांची तारीख आता जाहीर झाली आहे. येत्या २७ ऑक्टोबरला या निवडणुका होतील. ही निवडणूक ऐतिहासिक आणि राजकीय दृष्ट्या महत्वाची मानली जात आहे. कारण ७ ऑक्टोबर २०२३ मध्ये हमास ने केलेला हल्ला, त्यानंतर गाझा, लेबनान आणि ईराण यांच्यासोबत झालेल्या युद्धानंतर इज्राइल मधली ही पहिलीच राष्ट्रीय निवडणूक आहे.

निवडणुकीतील महत्वाचे मुद्दे काय आहेत 

या निवडणुकीत अतिआर्थोडॉक्स ज्यूंची सैन्यात सक्तीची भरती हा स्फोटक मुद्दा बनून समोर आला आहे. नेतन्याहूंच्या युतीतील सहकारी पक्षांना त्यांच्या समुदायाला लष्करी सेवेतून सूट मिळावी असे वाटते. तर दुसरीकडे सर्वसामान्य जनता आणि सैन्याचे म्हणणे आहे की, सध्याच्या युद्धाच्या परिस्थितीचा विचार करता आणखी जास्त सैनिकांची गरज आहे.याशिवाय नेतन्याहूंवर सुरू असलेले भ्रष्टाचाराचे खटले, वादग्रस्त न्यायिक सुधारणा आणि गाझामधील युद्धानंतरची व्यवस्था हे देखील असे मुद्दे आहेत जे मतदारांच्या भूमिकेवर परिणाम करतील.

Gaza News : गाझावासीयांसाठी FIFA World Cup चे स्क्रीनिंग करणाऱ्या सोशल वर्करचा मृत्यू; इस्रायलने हत्या केली?

नेतन्याहूंच्या राजकीय भविष्याची अग्निपरीक्षा

बेंजामिन नेतन्याहू हे इज्राईलच्या  इतिहासात सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेले नेते आहेत. आता 76 वर्षांच्या वयात ही निवडणूक त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे.जरी नेतन्याहूंनी स्पष्ट केले असले की ते पुन्हा निवडणूक लढवतील आणि आपले सरकार स्थापन करतील, तरीही अलीकडील सर्वेक्षण त्यांच्या बाजूने दिसत नाही.

इज्राइली नागरिकांचा प्रचंड रोष

या निवडणुकीत ७ ऑक्टोबर २०२३ ला सुरक्षेत झालेली चूक, या चुकीला घेऊन इज्राइली नागरिकांचा नेतन्याहू यांच्यावर खूप रोष आहे. तसेच याच्या व्यतिरिक्त हिब्रू युनिव्हर्सिटी ऑफ जेरुसलेम यांच्या सर्वे नुसार ९२% इज्राइली नागरिकांना असे वाटते कि सध्याच्या चाललेल्या युद्धात इज्राइल पेक्षा ईराण ची स्थिती चांगली आहे. अमेरिका इज्राइल यांच्या ईराण वरील हल्ल्यानंतर झालेला युद्धविराम आणि तेहरान वॊशिंग्टन करारा मध्ये इज्राइल च्या हिताचं काहीच घडलं नाही. असे लोकांचे मत झाले आहे. आणि याच मुळे नेतन्याहू यांची लोकप्रियता कमी होत चालली आहे.

नवीन सरकार स्थापन होण्याची शक्यता

नेतन्याहू यांच्या समोर यावेळी माजी लष्कर प्रमुख गादी आइजेनकोट यांचं आव्हान आहे. सर्वे सांगतात कि नेतन्याहू आणि त्यांच्या राष्ट्रवादी आणि धार्मिक पक्षांच्या युतीला बहुमत मिळणं थोडं अवघड आहे. परंतु विरोधी पक्षालाही सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेसे पर्याय उपलब्ध नाहीत. यामध्येच येत्या २७ ऑक्टोबरला कळू शकेल की नेतन्याहू यांना इज्राइली नागरिक पुन्हा सत्तेवर बसवतील कि सत्तेवरून पायउतार करतील.

US-Iran War: इराणचा आखाती देशांमध्ये कहर! कुवेत, बहरीन आणि जॉर्डनवर ड्रोनचा पाऊस; लष्कराकडून हाय अलर्ट जारी

Web Title: Elections in israel finally announced netanyahus future to be decided on october 27

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 08:57 PM

Topics:  

  • Election News
  • international news
  • iran
  • Israel

संबंधित बातम्या

Gaza News : गाझावासीयांसाठी FIFA World Cup चे स्क्रीनिंग करणाऱ्या सोशल वर्करचा मृत्यू; इस्रायलने हत्या केली?
1

Gaza News : गाझावासीयांसाठी FIFA World Cup चे स्क्रीनिंग करणाऱ्या सोशल वर्करचा मृत्यू; इस्रायलने हत्या केली?

Bushehr Nuclear Plant: अमेरिकेने इराणचा मुख्य अणुप्रकल्प उडवला की नाही? मध्य पूर्वेतील तणावादरम्यान तेहरानचा सर्वात मोठा खुलासा
2

Bushehr Nuclear Plant: अमेरिकेने इराणचा मुख्य अणुप्रकल्प उडवला की नाही? मध्य पूर्वेतील तणावादरम्यान तेहरानचा सर्वात मोठा खुलासा

‘अणुचाचणी कार्यक्रम त्वरित बंद करा नाहीतर…’, फ्रान्सने दिली ईराणला सक्त ताकीद , तेहरानमधूनही हल्ल्याची धमकी
3

‘अणुचाचणी कार्यक्रम त्वरित बंद करा नाहीतर…’, फ्रान्सने दिली ईराणला सक्त ताकीद , तेहरानमधूनही हल्ल्याची धमकी

Lindsey Graham: ‘मृत्यूचा व्यापारी नरकात गेला!’ इराणी सोशल मीडियाने अमेरिकेचा केला अपमान; ट्रम्प, नेतन्याहूंना जीवे मारण्याची धमकी
4

Lindsey Graham: ‘मृत्यूचा व्यापारी नरकात गेला!’ इराणी सोशल मीडियाने अमेरिकेचा केला अपमान; ट्रम्प, नेतन्याहूंना जीवे मारण्याची धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.