Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gunratna Sadawarte : ‘आधी शिवसेना भवनातील बाळासाहेबांचा फोटो काढा, नाहीतर..,’; सदावर्तेंचा थेट इशारा, 15 दिवसांची डेडलाइन

Gunratna Sadawarte : पुण्यातील मोदींच्या फोटोवरून सुरू झालेल्या वादात आता गुणरत्न सदावर्तेंची एन्ट्री झाली आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करत त्यांनी शिवसेना भवनातील बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा मुद्दा उपस्थित केला असून 15 दिवसांचा इशारा दिला आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 06, 2026 | 09:05 PM
राज ठाकरेंवर सदावर्तेंचा घणाघात, बाळासाहेबांच्या फोटोवरून थेट आव्हान

राज ठाकरेंवर सदावर्तेंचा घणाघात, बाळासाहेबांच्या फोटोवरून थेट आव्हान

Follow Us
Follow Us:
  • मोदींचा फोटो हटवल्याने आता राज ठाकरे विरुद्ध सदावर्ते असा वाद रंगला
  • राज ठाकरेंच्या भूमिकेवर शिवसेना भवनातील बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा मुद्दा उपस्थित
  • 15 दिवसांत फोटो हटवला नाही तर न्यायालयात जाणार, सदावर्तेंचा इशारा
 

Gunratna Sadawarte : पुण्यातील एका महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो महापुरुषांच्या छायाचित्रांसोबत लावण्यात आल्याने सुरू झालेला वाद आता चांगलाच पेटला आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी संबंधित फोटो हटवल्यानंतर भाजप आणि मनसेमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुद्द्यावर भूमिका मांडत सरकारी कार्यालयात पंतप्रधानांचा फोटो असायला हवा, मात्र तो छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या रांगेत नसावा, असं म्हटलं.

राज ठाकरेंच्या या भूमिकेवर आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी थेट शिवसेना भवनातील बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा दाखला देत राज ठाकरेंना सवाल केला.

‘बाळासाहेबांचा फोटो काढा’

सदावर्ते यांनी राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करताना शिवसेना भवनातील छायाचित्रांचा मुद्दा उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या वर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो ठेवणे योग्य आहे का, असा सवाल त्यांनी केला. शिवसेना भवनामधील फोटो प्रोटोकॉलनुसार आहेत का, याचं उत्तर राज ठाकरेंनी द्यावं, असंही त्यांनी म्हटलं.

DJ Ban Controversy : ‘राज ठाकरेंच्या डोक्याचा खोका खाली आहे का?’; DJ बंदीवरून गुणरत्न सदावर्तेंचा घणाघाती हल्ला

बाळासाहेब ठाकरे हे एका राजकीय पक्षाचे प्रमुख होते, तर छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वोच्च आदराचं स्थान असलेले व्यक्तिमत्त्व आहे, असा युक्तिवाद सदावर्तेंनी केला. त्यामुळे दोघांच्या प्रतिमांच्या मांडणीवरून त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली.

‘15 दिवसांची मुदत देतो’

सदावर्ते यांनी पुढे आक्रमक भूमिका घेत शिवसेना भवनातील संबंधित फोटो हटवण्याची मागणी केली. 15 दिवसांत हा फोटो काढला नाही, तर आपण स्वतः न्यायालयात जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. गरज पडल्यास उपोषण करण्याची तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Raj Thackeray on Modi Photo : ‘मोदींचा फोटो दुसऱ्या भिंतीवरती..,’ राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य; आशिष शेलारांचा पलटवार

‘शिवरायांचा अपमान सहन केला जाणार नाही’, अशी भूमिका मांडत सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्यांनी या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहण्याचं आवाहन केलं.

दरम्यान, पुण्यातील फोटो प्रकरणामुळे सुरू झालेला वाद आता मनसे, भाजप आणि ठाकरे गटाच्या राजकारणाशी जोडला जात असल्याने आगामी काळात या मुद्द्यावरून आणखी आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.

Web Title: Gunratna sadavarte raj thackeray balasaheb thackeray photo shiv sena bhavan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 09:05 PM

Topics:  

  • Balasaheb Thackeray
  • raj thackeray
  • Shivsena Bhavan

संबंधित बातम्या

DJ Ban Controversy : ‘राज ठाकरेंच्या डोक्याचा खोका खाली आहे का?’; DJ बंदीवरून गुणरत्न सदावर्तेंचा घणाघाती हल्ला
1

DJ Ban Controversy : ‘राज ठाकरेंच्या डोक्याचा खोका खाली आहे का?’; DJ बंदीवरून गुणरत्न सदावर्तेंचा घणाघाती हल्ला

Raj Thackeray on Modi Photo : ‘मोदींचा फोटो दुसऱ्या भिंतीवरती..,’ राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य; आशिष शेलारांचा पलटवार
2

Raj Thackeray on Modi Photo : ‘मोदींचा फोटो दुसऱ्या भिंतीवरती..,’ राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य; आशिष शेलारांचा पलटवार

Raj Thackeray on DJ : ‘डीजे-डॉल्बी ही उत्तरेची संस्कृती, महाराष्ट्रात का आणता?’; राज ठाकरेंचा परखड सवाल, फडणवीसांनाही लगावला टोला!
3

Raj Thackeray on DJ : ‘डीजे-डॉल्बी ही उत्तरेची संस्कृती, महाराष्ट्रात का आणता?’; राज ठाकरेंचा परखड सवाल, फडणवीसांनाही लगावला टोला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.