Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी भाषिकांना 80 टक्के नोकऱ्या देणाऱ्या धोरणाचे तीन तेरा; 1लाख नोकऱ्या सरकार परप्रांतीयांच्या घशात घालणार, मनसेचा आरोप

विमानतळ परिसरात एकूण चार टर्मिनल आहेत. प्रत्येक टर्मिनलवर साधारण 25 हजार नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. म्हणजे एकूण 1 लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 03, 2025 | 06:31 PM
मराठी भाषिकांना 80 टक्के नोकऱ्या देणाऱ्या धोरणाचे तीन तेरा; 1लाख नोकऱ्या सरकार परप्रांतीयांच्या घशात घालणार, मनसेचा आरोप
Follow Us
Close
Follow Us:
  • मराठी भाषिकांना 80 टक्के नोकऱ्या देणाऱ्या धोरणाचे तीन तेरा
  • 1लाख नोकऱ्या सरकार परप्रांतीयांच्या घशात घालणार
  • मनसेचा धक्कादायक आरोप

नवी मुंबई: विमानतळ परिसरात एकूण चार टर्मिनल आहेत. प्रत्येक टर्मिनलवर साधारण 25 हजार नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. म्हणजे एकूण 1 लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. सध्या पहिल्या टर्मिनल मध्ये होणाऱ्या नोकर भरतीमध्ये स्थानिकांना डावलले असल्याचे दिसून येते. माहिती अधिकारात मिळालेल्या धक्कादायक माहितीनुसार सदर विमानतळ प्रकल्पात स्थानिक आणि मराठी भाषिक उमेदवारांना प्राधान्य देण्या संदर्भात सिडकोने कोणतेही धोरण आखले नाही. तसेच आता पर्यंत या प्रकल्पात किती स्थानिक मराठी भाषिकांना समाविष्ट केले याची माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितलं. मनसे प्रवक्ते व शहरअध्यक्ष गजानन काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत संताप व्यक्त केला.

दोन वर्षांपूर्वी अयोध्येत स्थापन झालेल्या एका कंपनीने नवी मुंबई विमानतळ येथे नोकरीला लावून अनेक तरुणांची फसवणूक झाल्याचे पुराव्यासह दाखवून दिले. एका मराठी तरुणाकडून या कंपनीने नवी मुंबई विमानतळ मध्ये नोकरीला लावतो म्हणून 88हजार रुपये घेतले आणि फसवणूक केल्याचे तरुणाच्या चहा विकण्याचा व्यवसाय करणाऱ्या गरीब वडिलांनी भर पत्रकार परिषदेत सांगितले. त्याच प्रमाणे मनसे बेलापूर विभागअध्यक्ष व भूमिपुत्र भूषण कोळी यांनी आगरी कोळी समाजाला सिडकोने नोकऱ्या संदर्भात फसवले याची माहिती दिली. सिडकोने भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाव्या म्हणून कौशल्य विकास चे प्रशिक्षण कार्यक्रम आखले होते. परंतु सिडको प्रशासनाच्या अनास्थेमुळे हे प्रशिक्षण कार्यक्रम बंद झाले. आता विमानतळ प्रकल्पाशी संबंधित नोकऱ्या मिळण्यासाठी जे कौशल्य प्रशिक्षण आवश्यक आहे ते सिडकोने उपलब्ध करून न दिल्याने खाजगी प्रशिक्षण केंद्रात लाखो रुपये भरण्याची नामुष्की भूमिपुत्रांवर आली आहे.

Local Body Elections: महायुती – महाविकास आघाडीचा गोंधळ शिगेला! पैठण नगरपरिषद निवडणूक ठरणार लक्षवेधी

सिडको आणि नवी मुंबई विमानतळ प्रशासनाने या नोकऱ्या परप्रांतीयांच्या घशात घालण्याचा डाव आखला आहे असा घणाघात गजानन काळे यांनी केला. जर प्रशासनाने स्थानिक व मराठी भाषिकांना नोकरीत प्राधान्य नाही दिले तर येत्या काही दिवसांत मनसे नेते अमित साहेब ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्षाचा भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा गजानन काळे यांनी दिला. तसेच महाराष्ट्र सैनिकांना विमानतळाची धावपट्टी उखडणे अवघड काम नसल्याचे सांगून राजसाहेब यांनी दिलेल्या आदेशा प्रमाणे या विमानतळावरून एकही विमान उडू न देण्याची सोय आम्ही करू असा सज्जड दम ही गजानन काळे यांनी दिला.

या पत्रकार परिषदेत मनसे प्रवक्ते व शहरअध्यक्ष गजानन काळे, उपशहरअध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सहसचिव अभिजीत देसाई, महिला सेना शहरअध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, वाहतूक सेना सरचिटणीस नितीन खानविलकर, विद्यार्थी सेना शहरअध्यक्ष संदेश डोंगरे, रोजगार शहर अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, चित्रपट सेना शहरअध्यक्ष अनिकेत पाटील, मनसे विभाग अध्यक्ष भूषण कोळी, अभिलेश दंडवते, सागर विचारे, शाम ढमाले, मनसे महिला सेना उपशहरअध्यक्ष दिपाली ढवूल, शहर सचिव यशोदा खेडसकर, मनसे उपविभागअध्यक्ष संदेश खांबे हे उपस्थित होते.

Maharashtra Politics: आशिष शेलारांनी केली निवडणूक आयोगाची पाठराखण; पुरावे दाखवत केली रोहित पवारांची पोलखोल

 

Web Title: Httpswwwnavarashtracompoliticsthe policy of giving 80 percent jobs to marathi speakers is a failure mns alleges

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 06:29 PM

Topics:  

  • Marathi News
  • MNS
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

CAT 2025 : एक शुल्लक चूकही पडू शकते महागात, परिक्षेला जाण्याआधी ‘या’ सोप्या टीप्स नक्की फॉल्लो करा
1

CAT 2025 : एक शुल्लक चूकही पडू शकते महागात, परिक्षेला जाण्याआधी ‘या’ सोप्या टीप्स नक्की फॉल्लो करा

क्षितिज पटवर्धन दिग्दर्शित ‘उत्तर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, आई मुलाच्या नात्याची उलगडणार गोष्ट
2

क्षितिज पटवर्धन दिग्दर्शित ‘उत्तर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, आई मुलाच्या नात्याची उलगडणार गोष्ट

Satara News : निवडणूकीचं बिगुल वाजणार; सातारकरांना हवाय काम करणारा नगरसेवक
3

Satara News : निवडणूकीचं बिगुल वाजणार; सातारकरांना हवाय काम करणारा नगरसेवक

‘आम्ही दोघी’ नंतर मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट पुन्हा एकत्र; ‘असंभव’मधून रंगणार रहस्यमय कथा
4

‘आम्ही दोघी’ नंतर मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट पुन्हा एकत्र; ‘असंभव’मधून रंगणार रहस्यमय कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.