Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येतील का? तर केंद्रातील ‘या’ मंत्र्याने केलं मोठं विधान; म्हणाले…

राज ठाकरेंच्या एवढ्या मोठ्या सभा होऊनही त्यांचा एकही माणूस निवडून येत नाही. लोकसभेला त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता. त्याचा फारसा फायदा झाल्याचे मला दिसत नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 26, 2025 | 07:17 AM
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येतील का?; केंद्रातील 'या' मंत्र्याने केलं मोठं विधान

उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येतील का?; केंद्रातील 'या' मंत्र्याने केलं मोठं विधान

Follow Us
Close
Follow Us:

इंदापूर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून टीकाटिप्पणी केली जात आहे. असे असताना आता चर्चा सुरु आहे ती ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची. त्यावर आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केले. ‘राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील असे वाटत नाही. आणि जरी एकत्र आले तरी महायुतीवर त्याचा परिणाम होणार नाही’, असे त्यांनी म्हटले आहे.

हेदेखील वाचा : Maharashtra Politics : जयंत पाटलांच्या गुप्त हालचाली; बंद दाराआड चंद्रशेखर बावनकुळेंसोबत एक तास चर्चा

इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधताना आठवले बोलत होते. यावेळी विक्रम शेलार, शिवाजीराव मखरे, बाळासाहेब सरवदे, संदिपान कडवळे, अमोल मिसाळ, हनुमंत कांबळे, अरविंद वाघ, कैलास कदम, किरण गानबोटे, लखन जगताप, रमेश शिंदे यांनी आठवले यांचा सत्कार केला.

यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले, ‘राज ठाकरेंच्या एवढ्या मोठ्या सभा होऊनही त्यांचा एकही माणूस निवडून येत नाही. लोकसभेला त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता. त्याचा फारसा फायदा झाल्याचे मला दिसत नाही. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील असे वाटत नाही. आणि जरी एकत्र आले तरी महायुतीवर त्याचा परिणाम होणार नाही’.

यावेळी प्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना आठवले म्हणाले, इंदापूर पोलीस खोटे गुन्हे करत असल्याचे सांगितले जाते. कोणताही गुन्हा खोटा असू नये. अशा घटना घडत असतील तर मी पोलीस अधीक्षकांशी चर्चा करेल. आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण चुकीच्या गोष्टी करू नये. चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांचं पाठबळ असायला हवे. असे गुन्हे नोंदवले जाऊ नये यासाठी मी नक्की प्रयत्न करेन.

‘प्रत्येक केसला लव्ह जिहाद म्हणू नये’

‘लव्ह जिहाद’चा कायदा असा आहे की, अनेक वेळा मुलं-मुली एकत्र येतात त्यांना त्यांची जात माहित नसते. तरी देखील एकत्र येऊन संसार थाटावा अशी त्यांची इच्छा असते. धर्म-जात बाजूला ठेवून दोघे एकत्र येतात. प्रत्येक केसला लव्ह जिहाद म्हणू नये, असेही आठवले यांनी सांगितले.

हेदेखील वाचा : दिवसभर बसून काम केल्याने होतात गंभीर आजार ; 30 ते 45 वयोगटातील तरुणांमध्ये सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिसची समस्या

Web Title: I dont think raj thackeray and uddhav thackeray will come together says ramdas athawale nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2025 | 07:13 AM

Topics:  

  • raj thackeray
  • Ramdas Athawale
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?
1

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?

Maharashtra Politics: मुख्यमंत्री फडणवीसांनी पूर्ण केली उद्धव ठाकरेंची ती इच्छा; एकनाथ शिंदे गटाला बसला जोरदार धक्का
2

Maharashtra Politics: मुख्यमंत्री फडणवीसांनी पूर्ण केली उद्धव ठाकरेंची ती इच्छा; एकनाथ शिंदे गटाला बसला जोरदार धक्का

Maharashtra Politics : नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; माजी नगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश
3

Maharashtra Politics : नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; माजी नगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.