
Imtiaz Jaleel reacts to the AIMIM and BJP alliance in Akola
AIMIM नेते इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपसोबत केलेल्या युतीवर स्पष्ट मत मांडले आहे. इम्तियाज जलील म्हणाले, “अकोटमध्ये शहराच्या विकासासाठी अकोट विकास आघाडी स्थापन करण्यात आली. या आघाडीमध्ये अकोटमधील सर्वच राजकीय पक्ष सामील आहेत. शिवसेना, वंचित, प्रहार, दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस हे पक्ष या आघाडीत आहेत. त्यामुळे एआयएमआयएमलाही तिथे बोलावण्यात आले. पण आम्ही कोणत्याही परिस्थितीत भाजपाबरोबर जाणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका इम्तियाज जलील यांनी घेतली.
हे देखील वाचा : अंबरनाथमध्ये भाजप अन् कॉंग्रेसचे हातात हात! अंबादास दानवेंचा जोरदार प्रहार, भाजप हा ‘यूज अँड थ्रो’ करणारा
पुढे ते म्हणाले की, “आम्ही आतापर्यंत भाजपाविरोधात राजकारण केलं. त्यामुळे या तत्वाशी आम्ही कधीही तडजोड करणार नाही. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांना संबंधित आघाडीतून बाहेर पडत असल्याचं लेखी द्यायला सांगितलं आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत भाजपाबरोबर बसणार नाही. ज्या पक्षाने या देशात जाती-धर्मात तेढ निर्माण करण्याचं काम केलंय, त्यासोबत आम्ही बसणार नाही. आमच्या पाचही कॉन्सलरना आदेश दिले आहेत. लिखितमध्ये द्यायला सांगितले आहे. महाराष्ट्रात आम्ही कुठेही, कोणतीही आघाडी होऊद्या, आम्ही भाजपाबरोबर जाणार नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केले.
हे देखील वाचा : निवडणुकीच्या तोंडावर भाजपला दणका! प्रचार गीतातील एका शब्दाने निवडणूक आयोगाचा स्पष्ट नकार
“विदर्भाची सर्व जबबादारी युसुफ अन्सारी यांना दिली आहे. त्यामुळे निर्णय घेण्याचे अधिकार त्यांच्याकडे आहेत. पण इतका महत्त्वाचा निर्णय घेण्याअगोदर त्यांनी वरिष्ठांशी बोलायला हवं होत. त्यांच्याकडूनही आम्ही लिखित मागवले आहे. तसंच, असदुद्दीन ओवैसीही रागवले आहेत, त्यांनीही भाजपाबरोबर जाणार नसल्याचं स्पष्ट केले आहे”, असं जलील म्हणाले. विकासाचा मुद्दा आमच्यासाठी दुय्यम्, पण आम्ही भाजपाबरोबर जाणार नसल्याचं त्यांनी सांगितले.