Imtiaz Jaleel's aggressive reaction to the renaming of Aurangzeb's tomb village Khultabad to Ratnapur
खुलताबाद : राज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीवरुन जोरदार राजकारण रंगले आहे. अबू आझमी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले. यानंतर औरंगजेबाची कबर उखडण्यात यावी अशी मागणी राज्यभरातून होऊ लागली. यामुळे तणावपूर्ण वातावरण देखील निर्माण झाले होते. यानंतर आता शिंदे गटाच्या नेत्यांकडून औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचे हे नाव बदलण्याची मागणी केली जात आहे. यावर AIMIM चे नेते इम्तियाज जलील यांनी रोष व्यक्त केला आहे. यापूर्वी देखील औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्यात आले आहेत. यानंतर आता रत्नपूरवरुन राजकारण रंगले आहे.
शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणला आहे. शिरसाट यांनी औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचे हे नाव बदलण्याची मागणी केली. संजय शिरसाट म्हणाले की, “औरंगजेबाने आपल्या ठिकाणांची नावं बदलली होती. औरंगजेबाची कबर खुलताबाद याठिकाणी आहे. परंतु इंग्रजांच्या काळात ते रत्नपूर म्हणून ओळखलं जात होतं. काही लोकांना औरंगजेबावर प्रेम उसळून येतंय. परंतु आपल्याला आपली संस्कृती वाचवावी लागले, असे म्हणत संजय शिरसाट यांनी नवीन मुद्दा सुरु केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “आम्ही औरंगजेबाची प्रॉपर्टी हिसकावून घेत नाही आहोत. आम्ही आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतोय. त्याचप्रमाणे दौलताबादचंही खरं नाव देवगिरी असं आहे. तिथे राजा राम देव राय यांनी राज्य केलं होतं. हा त्यांचा वारसा आहे. ते नावसुद्धा बदलायला हवं. आम्ही कोणती नवी मागणी करत नाही आहोत. औरंगजेबाने काबिज केल्यानंतर या ठिकाणांची नावं बदलली होती. आता तेच आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर याबाबतचा प्रस्ताव देणार आहोत. विधानसभेतही आम्ही हा प्रस्ताव आणू, “ असे म्हणत संजय शिरसाट यांनी नवीन मुद्द्यांला हात घातला आहे. यावरुन AIMIM चे नेते इम्तियाज जलील यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
इम्तियाज जलील यांनी बापाचे नाव देखील बदला असे म्हणत जहरी टीका केली आहे. ते म्हणाले की, तुम्ही शहरांची, इमारतींची, रस्त्यांची नावं बदलत आहात. आता जर नावं बदलण्याची मालिका सुरूच झाली आहे तर तुम्ही तुमच्या बापाचंही नाव बदलून घ्या. आता अजून राहिलंय तरी काय? सांगून टाका की आम्हाला हे नाव आवडलं नव्हतं, आता हे नाव बदलणार. इथल्या शहरांची नावं बदलत आहात, परंतु गुजरातच्या अहमदाबादमध्ये तुमचा बाप बसलाय का? असा थेट सवाल इम्तियाज जलील यांनी विचारला आहे.