
हातकणंगलेत जिल्हा परिषदेसाठी 4 तर पंचायत समितीसाठी एक अर्ज दाखल; आत्तापर्यंत 713 अर्जांची विक्री
हातकणंगले : तालुक्यातील ११ जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या २२ जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी ४ व पंचायत समितीसाठी एक अर्ज दाखल झाला आहे. त्यात ७१३ इतक्या विक्रमी अर्जाची विक्री झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी दिली.
गेल्या दोन दिवसांपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे. पण कागदपत्रांची जुळवाजुळव व शनिवारी अमावस्या असल्याने उमेदवारी अर्ज दाखल झाले नव्हते. मात्र, पण अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी इच्छुक उमेदद्वारांनी गर्दी केल्याचे पहायला मिळाले. अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये जिल्हा परिषदेसाठी आळते, रेंदाळ व रुकडी जिल्हा परिषद गटातून तर भादोले पंचायत समिती गणातून अर्ज दाखल केले. अद्यापही पक्षांकडून अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडणार आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज; 27 जानेवारीला उमेदवारांची अंतिम यादी होणार प्रसिद्ध
दरम्यान, सध्या दाखल केलेल्यांमध्ये आळते जिल्हा परिषद मतदार संघ-देवेंद्र नाना मोहिते (अपक्ष) , रुकडी जिल्हा परिषद गट अविनाश सहदेव बनगे (शिवसेना), अविनाश सहदेव बनगे (अपक्ष), अतिष नंदकुमार शिंगे (शिवसेना) तर पंचायत समितीसाठी भादोले गण-राजहंस तुकाराम भुजिंगे (भारतीय प्रजा स्वराज पक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी दीपक शिंदे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुशील बेलेकर यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी तयारी सुरु
राज्यातील महानगरपालिकेच्या रणधुमाळीत भाजपला जनतेचा कौल मिळाला. आता यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका येत आहेत. याचपार्श्वभूमीवर चिपळूणात भाजपने उमेदवार जाहीर केला आहे. विधी व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ऍड. नयना उदय पवार यांना भाजपतर्फे शिरगाव पंचायत समिती गणासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्याने शिवसेना-भाजप युतीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
हेदेखील वाचा : ZP Election 2026 : निवडणुकीचा रणसंग्राम; रत्नागिरीत निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर