Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajya Sabha Election : राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार; शरद पवारांसह विनोद तावडे, पार्थ पवारही वरिष्ठ सभागृहात

राज्यसभेच्या निवडणुकीत अखेरच्या क्षणी मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला. अतिरिक्त मतांच्या जोरावर शिंदे गट दुसरा उमेदवार देऊन निवडणूक रंगतदार करेल, अशी चर्चा होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 06, 2026 | 07:18 AM
राज्यसभा निवडणूक बिनविरोध निश्चित

राज्यसभा निवडणूक बिनविरोध निश्चित

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद यांसारख्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर आता राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागा भरल्या जाणार आहेत. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी दाखल झालेल्या अर्जामुळे निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 7 जागांसाठी नेमके सातच अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाची गरज राहिलेली नाही. बिनविरोधची औपचारिक घोषणा बाकी आहे.

भाजपकडून 4 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात रामदास आठवले, विनोद तावडे, माया ईवनाते आणि रामराव वडकुते यांचा समावेश आहे. तर शिवसेना (शिंदे गट) कडून ज्योती वाघमारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज भरताना विशेष परिस्थितीही पाहायला मिळाली. तब्येतीच्या कारणामुळे शरद पवार स्वतः उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरताना आजारी उमेदवाराच्या घरी जाऊन प्रक्रिया पार पाडण्याची ही दुर्मिळ घटना मानली जात आहे. यामुळे महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांवर निवड जवळपास निश्चित झाली असून, आता केवळ औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे.

हेदेखील वाचा : Nitish Kumar : अमित शाहांच्या उपस्थितीत नीतीश कुमार यांचा राज्यसभेचा अर्ज दाखल; लवकरच देणार CM पदाचा राजीनामा

दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीत अखेरच्या क्षणी मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला. अतिरिक्त मतांच्या जोरावर शिंदे गट दुसरा उमेदवार देऊन निवडणूक रंगतदार करेल, अशी चर्चा होती. त्यासाठी रोहित टिळक यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती. मात्र, अखेरच्या क्षणी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने दुसरा उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सात जागांसाठी सातच अर्ज दाखल झाले आणि निवडणूक बिनविरोध होण्याचे चित्र स्पष्ट झाले.

हे देखील वाचा : बिहारच्या राजकारणात भूकंप! नीतीश कुमार दिल्लीला गेल्यानंतर कोण सांभाळणार मुख्यमंत्रिपदाची धुरा?

उमेदवारी जाहीर होताच विनोद तावडेंनी मानले आभार

“अनंत आभार आणि धन्यवाद! पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने राज्यसभेचा उमेदवार म्हणून निवड केल्याबद्दल वरिष्ठ नेतृत्वाचे मनापासून आभार! माननीय पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या नेतृत्वाखाली, आम्ही नेहमीच देशहिताची सेवा करण्यास वचनबद्ध आहोत. या नामांकनाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मनापासून आभार! ही नवीन जबाबदारी पूर्ण समर्पण आणि निष्ठेने पार पाडण्यासाठी मी दृढ आणि वचनबद्ध आहे.

Web Title: Rajya sabha elections will be held unopposed along with sharad pawar vinod tawde parth pawar will also be in the upper house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 07:11 AM

Topics:  

  • parth pawar
  • political news
  • Rajya Sabha Election
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

वणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या आतापासून हालचाली; भावी उमेदवारांनी बांधले गुडघ्याला बाशिंग
1

वणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या आतापासून हालचाली; भावी उमेदवारांनी बांधले गुडघ्याला बाशिंग

Sharad Pawar News: महागाईने सर्वसामान्य त्रस्त, अन् सरकार ठरवून इश्यू पुढे आणतंय!; शरद पवारांचा सनसनाटी आरोप
2

Sharad Pawar News: महागाईने सर्वसामान्य त्रस्त, अन् सरकार ठरवून इश्यू पुढे आणतंय!; शरद पवारांचा सनसनाटी आरोप

Sharad Pawar on Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर शरद पवारांची प्रतिक्रिया; FDA च्या कारवाईमुळे दूधाच्या दरावर परिणाम?
3

Sharad Pawar on Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर शरद पवारांची प्रतिक्रिया; FDA च्या कारवाईमुळे दूधाच्या दरावर परिणाम?

Sharad Pawar: ‘महागाईच्या झळा आणखी तीव्र होणार’; अर्थव्यवस्था, दुष्काळ अन् साखरेच्या दरांवरून शरद पवारांनी सरकारला घेरलं
4

Sharad Pawar: ‘महागाईच्या झळा आणखी तीव्र होणार’; अर्थव्यवस्था, दुष्काळ अन् साखरेच्या दरांवरून शरद पवारांनी सरकारला घेरलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.